Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रव्यंकटराव संकुल आजरा येथे "सायन्स अकॅडमी वर्ग " शुभारंभ कार्यक्रम संपन्न.🛑देशपातळीवर झळकले...

व्यंकटराव संकुल आजरा येथे “सायन्स अकॅडमी वर्ग ” शुभारंभ कार्यक्रम संपन्न.🛑देशपातळीवर झळकले व्यंकटराव हायस्कूलचे यश ‘

🛑व्यंकटराव संकुल आजरा येथे “सायन्स अकॅडमी वर्ग ” शुभारंभ कार्यक्रम संपन्न.
🛑देशपातळीवर झळकले व्यंकटराव हायस्कूलचे यश ‘

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

येथील आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित.. व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा मार्फत सायन्स ॲकॅडमी वर्गाचा शुभारंभ कार्यक्रम संस्था अध्यक्ष श्री जयवंतराव शिंपी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.. या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते इतिहास अभ्यासक, लेखक व कवी प्रा. मधुकर पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते.. उद्याच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थी शिक्षक व पालक यांची भूमिका या विषयावर बोलताना प्रा मधुकर पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्याने लहानपणापासून आपले ध्येय निश्चित करावे ते करत असताना प्रथम आपल्या परिस्थिती आणि डोळ्यासमोर आई-वडिलांचे काबाड कष्ट यांचा विचार केला पाहिजे. म्हणजे आजच्या आधुनिक युगात मोबाईल आणि इतर अवांतर गोष्टीकडे त्याचे मन वळणार नाही. असे सांगत कष्ट करण्याची तयारी आणि वेळेचे नियोजन तसेच परिस्थितीची जाणीव ठेवून गरीब परिस्थितीतही एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या अनेक ध्येयवादी विद्यार्थ्यांची उदाहरणे देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थी पालक यांच्यामध्ये नव चेतना निर्माण करण्याचे काम या व्याख्यानातून झाल्याचे दिसते. संस्थेचे सचिव श्री अभिषेक शिंपी यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की,आजरा शहरात प्रथमच व्यंकटराव संकुलामार्फत सुरू होणाऱ्या सायन्स अकॅडमी या वर्गाचा उद्देश म्हणजे तालुक्यातील गाव व खेडोपाड्यातील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना जेईई,नीट, परीक्षेची तयारी करता यावी आणि पुढे आपल्या अकॅडमी मधून आयआयटीमध्ये प्रवेश, शास्त्रज्ञ ,उत्कृष्ट इंजिनियर, डॉक्टर, तसेच अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी ही या वर्गातून करून घेतली जाणार आहे. यासाठी इयत्ता आठवी नववी दहावी साठी फाउंडेशन कोर्स व अकरावी बारावी ॲकॅडमीचा कोर्स सुरू करत आहोत यामध्ये दिल्ली येथील नामांकित कॉलेजमधील अकॅडमी वर्गातील अध्यापनाचा अनुभव असणारे चार प्राध्यापक ज्ञानदान करणार आहेत.
अध्यक्षीय मनोगतामध्ये श्री जयवंतराव शिंपी यांनी प्रशालेच्या या यशस्वी वाटचालीमधील अकॅडमी वर्गाचा शुभारंभ म्हणजे आपल्या व्यंकटराव प्रशालेतून अनेक विद्यार्थी प्रतिवर्षी पालक शिक्षक यांच्या संस्कार आणि ज्ञानाच्या जोरावर देशातील विविध क्षेत्रात आजऱ्याच्या मातीचा सुगंध दरवळत ठेवणार आहेत.
या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष एस पी कांबळे, खजिनदार सुनील पाटील, संचालक कृष्णा पटेकर, श्री सचिन शिंपी, श्री पांडुरंग जाधव, श्री सुधीर जाधव, विक्रांत पटेकर, अशोक पोवार, प्राचार्य आर जी कुंभार, पर्यवेक्षिका सौ व्ही.जे. शेलार, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य श्री पन्हाळकर, प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती संजीवनी चव्हाण, भादवण हायस्कूल मुख्याध्यापक श्री एस एन पाटील, सिरसंगी हायस्कूल मुख्याध्यापक श्री महादेव नागुर्डेकर, देवर्डे हायस्कूल मुख्याध्यापक श्री सुभाष सावंत ,पालक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पारळे यांनी केले, प्रमुख वक्त्याचा परिचय व्ही टी कांबळे यांनी केले व आभार व्ही.ए वडवळेकर यांनी माणले.

🛑देशपातळीवर झळकले व्यंकटराव हायस्कूलचे यश ‘

आजरा.-प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशपातळीवर व्यंकटराव हायस्कूलचे यश झळकावले आहे.‌यामध्ये

१) कुमार स्वराज प्रवीण निंबाळकर.
देशात १८ वा सुवर्णपदक विजेता व रोख रक्कम प्राप्त विद्यार्थी
२) कुमार विवेक धनाजी पाटील
देशात २६ वा
सुवर्णपदक विजेती व रोख रक्कम प्राप्त विद्यार्थी
३) कुमारी सौश्रुती अमित पुंडपळ
देशात ५२ वी
सुवर्णपदक विजेती व रोख रक्कम प्राप्त विद्यार्थिनी
४ ) कुमारी संस्कृती धनाजी इलगे
कास्यपदक विजेती विद्यार्थिनी
प्रमाणपत्रधारक विद्यार्थी ६) अर्णव समीर जाधव वरील यशस्वी विद्यार्थ्यांना सौ.ए.डी.पाटील पी.एस.गुरव यांचे मार्गदर्शन व प्राचार्य आर.जी.कुंभार
पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार यांचे प्रोत्साहन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव व संचालक आजरा महाल शिक्षण मंडळ,आजरा यांची प्रेरणा लाभली
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.