Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र आजरा अक्कलकोट एसटी बस चालू करावी.- अन्याय निवारण समितीचे आगार व्यवस्थापक निवेदन.(...

आजरा अक्कलकोट एसटी बस चालू करावी.- अन्याय निवारण समितीचे आगार व्यवस्थापक निवेदन.( वहातुक नियंत्रक कर्मचारी मुंडे नागरिकांशी हुज्जत घालतात – याकडे आगाराचे दुर्लक्ष.)

Oplus_131072

आजरा अक्कलकोट एसटी बस चालू करावी.- अन्याय निवारण समितीचे आगार व्यवस्थापक निवेदन.
( वहातुक नियंत्रक कर्मचारी मुंडे नागरिकांशी हुज्जत घालतात – याकडे आगाराचे दुर्लक्ष.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील एस. टी डेपो आगार व्यवस्थापक यांना अन्याय निवारण समितीने निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा ते अक्कलकोट एसटी बस चालू करून प्रवाशांना सहकार्य करावे कारण आजरा तालूका हा फारच दुर्गम आहे. या तालुक्यातील बहूतेक सर्व प्रवासी हे एस टी बस वर अवलंबून असतात बर्‍याच वेळा बस स्थानका मध्ये काही ठिकाणच्या गाड्या नाहीत. असे फलक लावण्यात आलेले असतात.

त्या मुळे ऐन वेळी प्रवाशांची कुचंबणा होते. गाडी रद्दबाबत विचारा केली असता योग्य उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात किंवा डेपोत विचारणा करा असे सांगितले जाते. सद्या स्थानकात कार्यरत असलेले वहातुक नियंत्रक कर्मचारी मुंडे हे कडुन समोरच्या व्यक्तीचा आदर केला जात नाही या बाबत भरपुर तक्रारी असून सुद्धा आपण याकडे दुर्लक्ष करत आहात तेंव्हा याबाबत योग्य ती कारवाई करणेत यावी.


तालुक्यातील शाळेच्या विध्यार्थी व प्रवाशांच्या सोयीसाठी कमी अंतरावर सोडणे आलेल्या बस मुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने सदर गाड्या बंद (रद्द) न करता मिळत असलेले कमी उत्पन्न भरुन काढण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाडय़ा चालु कराव्यात तेंव्हा या निवेदना नुसार आपलेला असे निर्देशित करतो की आपले आगारासाठी नवीन ५ बसेस प्राप्त झालेल्या आहेत.

Oplus_131072

तेंव्हा आजरा तालुक्यात स्वामी समर्थ महाराजाचें भरपूर भक्त असून त्यांचे सेवेसाठी आजरा आगारातून आजरा – निपाणी – कोल्हापूर-सांगली – अक्कलकोट अशी स्वच्छ नियमीत बस सोडण्यात यावी त्या मुळे आगाराचे उत्पन्नात निश्चितच वाढ होईल त्याच प्रमाणे आजरा आदमापूर असी जास्त प्रमाणात प्रवासी कसे मिळतील असा रुट पाहून सदरची बस सोडण्यात यावी.


वरील दोन ठिकाणच्या बस सोडणे बाबत ताबडतोब कार्यवाही करणेत यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे, पांडुरंग सावतरकर, गौरव देशपांडे, जावेद पठान, जोतिबा आजगेकर सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.