Homeकोंकण - ठाणेतापमान वाढीमुळे कोल्हापूर शहरांमधील सर्व सिग्नल १२ ते सायं ४ पर्यंत वेळेत...

तापमान वाढीमुळे कोल्हापूर शहरांमधील सर्व सिग्नल १२ ते सायं ४ पर्यंत वेळेत बंद करावे .- कोल्हापूर युवक कृती समितीची मागणी.🟥जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला.- 27 पर्यटक ठार झाल्याची शक्यता.🛑नववधूचा चुडा पाहून गोळी झाडली.- डोळ्यांत स्वप्न घेऊन गेलेल्या तरुणीचं दहशतवाद्यांनी सौभाग्य हिरावलं.

🛑तापमान वाढीमुळे कोल्हापूर शहरांमधील सर्व सिग्नल १२ ते सायं ४ पर्यंत वेळेत बंद करावे .- कोल्हापूर युवक कृती समितीची मागणी.
🟥जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला.- 27 पर्यटक ठार झाल्याची शक्यता.
🛑नववधूचा चुडा पाहून गोळी झाडली.- डोळ्यांत स्वप्न घेऊन गेलेल्या तरुणीचं दहशतवाद्यांनी सौभाग्य हिरावलं.

💥तापमान वाढीमुळे कोल्हापूर शहरांमधील सर्व सिग्नल १२ ते सायं ४ पर्यंत वेळेत बंद करावे .- कोल्हापूर युवक कृती समितीची मागणी.

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

Oplus_131072

महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट वाढत आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. यामध्ये उन्हाचे प्रमाण वाढले आहे.


कोल्हापूर मध्ये देखीलउन्हाचा चटका अधिक जाणवत असल्याने घराबाहेर पडणे अशक्य होत आहे. बऱ्याच जिल्ह्यामध्ये उष्माबळी प्रकार देखील समोर येत आहेत कोल्हापूर शहरामध्ये देखील उन्हाचे तापमान हवामान खात्याच्या अंदाजे नुसार ४०° ते ४२°अंश सेल्सिअस इतके जात आहे कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गांवर दोन मिनिटाचे थांबा सिग्नल आहेत.


कोल्हापूर शहरांमध्ये वृद्ध, विद्यार्थी -विद्यार्थिनी, तरुण महिला – पुरुष प्रवास करत असतात उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांना प्रवास करताना प्रचंड त्रास होत आहे. भविष्यात उष्माघाताचा प्रकार होण्याचे नाकारता येत नाही त्यामुळे कोल्हापूर मधील सर्व सिग्नल १२ ते ४ या वेळेत बंद करावे या मागणीचे निवेदन कोल्हापूर युवक कृती समितीच्या वतीने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांना देण्यात आले
यावेळी निलेश सुतार, मयूर पाटील, विश्वविक्रम कांबळे, संजय पटकरे,सागर घोलप, रोहन वाघमारे, सचिन पाटील ,रंगराव पाटील , गौरव कांबळे उपस्थित होते.

🟥जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला.- 27 पर्यटक ठार झाल्याची शक्यता.
( जम्मू काश्मिरमध्ये रक्ताचा सडा; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने श्रीनगरला रवाना.)

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात 27 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे शस्त्रधारी दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका ग्रुपवर भ्याड हल्ला केला. त्यामध्ये, अनेक पर्यटकांचा जीव गेला असून काही गंभीर जखमी देखील झाले आहेत. दहशतवाद्यांना 40 राऊंड फायर केल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री यांच्याच फोनवरुन बोलणे झाले. त्यानंतर, गृहमंत्री अमित शाह तातडीने श्रीनगरकडे रवाना झाले आहेत.

🟣जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने आपण व्यथित झालो आहोत. मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करू, असा इशाराच गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवरुन दिला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील त्यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर, संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली असून श्रीनगरला गेल्यावर सर्व सुरक्षा एजन्सींसोबत तातडीची सुरक्षा आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

Oplus_131072

त्यासाठी, आपण श्रीनगरला रवाना होत असल्याचेही अमित शाह यांनी ट्विटरवरुन सांगितले. पहलगाममध्ये पोलिसांच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आपला निशाणा बनवला. पर्यटकांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या वेळी एक नवविवाहित जोडपेदखील दहशतवाद्यांच्या हल्लातून सुटले नाही. या जोडप्यातील पुरुषाला आधी त्याचा धर्म विचारला आणि मग त्याला गोळ्या घालण्यात आल्याचं त्याच्या पत्नीने सांगितलं. ही महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी लोकांना आवाहन करत होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी खिन्न मनाने ती मृत पतीच्या शेजारी बसली.

🛑नववधूचा चुडा पाहून गोळी झाडली.- डोळ्यांत स्वप्न घेऊन गेलेल्या तरुणीचं दहशतवाद्यांनी सौभाग्य हिरावलं

श्रीनगर :- वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यानंतर पहलगाम येथून जे फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत ते मन सुन्न करणारे आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत २८ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारात एका नववधूने आपल्या नवऱ्याला गमावलं आहे. हे जोडपं लग्नानंतर फिरायला आले होते. पण, दहशतवाद्यांनी तिच्या समोरच तिच्या पतीला गोळ्या घातल्या. यानंतर या जोडप्याचा काळीज चिरणारा एक फोटो समोर आला, ज्यामध्ये हाती लाल रंगाचा चुडा असलेली नवविवाहिता आपल्या पतीच्या निपचित पडलेल्या देहाच्या बाजुला बसली आहे. तिच्या हातातील लाल चुडा पाहिला, तिच्या पतीने मुस्लिम नसल्यासं सांगितलं आणि दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या झाडल्या.

हे दहशतवादी पोलिसांच्या वेषात आले होते, त्यामुळे त्यांच्यावर कोणाला संशय आला नाही. य दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांना लक्ष्य केलं. विशेष म्हणजे त्यांनी या पर्यटकांना आधी त्यांचा धर्म विचारला. मुस्लिम नसल्याचं सांगितल्याने त्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतही काहीतरी म्हणाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. या पर्यटकांमध्ये एक तरुणी अशी होती जी आपल्या पतीसोबत लग्नानंतर फिरायला आली होती. या नवविवाहित जोडप्याने कधी विचारही केला नसेल की त्यांचं हनिमून त्यांच्यासाठी काळरात्र ठरेल. दहशतवाद्यांनी आधी या तरुणीच्या पतीला त्याचा धर्म विचारला, त्याने मुस्लिम नसल्याचं सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी पतीवर गोळ्या झाडल्या, असं रडत रडत ही तरुणी सांगत आहे.

आपल्या पतीला कोणीतरी वाचवा अशी याचना ती करत होती, मात्र तिचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. सारी आस गमावल्यानंतर ही तरुणी खिन्न मनाने आपल्या पतीच्या मृतदेहा शेजारी बसली. हे पाहून उपस्थित साऱ्यांच्यांच काळजात धस्स झालं. मिळालेल्या माहितीनुसार, याच तरुणीने पीसीआरला फोन केला होता. तिने फोन करुन सांगितंल की पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या आहे. दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. धर्म विचारल्यानंतर गोळ्या घालण्यात आल्या आहेत. हातातील लाल चुडा पाहिला, मग धर्म विचारला आणि मग तिच्या पतीला गोळ्या घातल्या, असं तिने म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.