🛑ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा. ( जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती)
🛑आजरा येथे जनसुरक्षा विधेयक विरोधात, तहसीलदार यांना निवेदन.
कोल्हापूर.- प्रतिनिधी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत महाविद्यालयीन गटात वैष्णवी संतोष पाडले प्रथम क्रमांकाची विजेती ठरली. तर शिवराज महाविद्यालयाची प्रणाली आनंदा सोलापूरे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक कार्यकर्ता एक दिवसीय कार्यशाळेत बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी टी शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डो. व्ही. एन. शिंदे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे, ग्रामपंचायत महाराष्ट्राचे राज्य सचिव अरुण वाघमारे, कोषाध्यक्ष सुनिता राजे- घाटगे, जिल्हाध्यक्ष बी. जे. पाटील, उपाध्यक्ष सुधाकर भदरगे, सतीश फणसे, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगडचे विभागीय अध्यक्ष शिवाजीराव गुरव, आजरा तालुकाध्यक्ष महादेव सुतार, गडहिंग्लज तालुका सचिव अनिल कलकुटकी, महिला पदाधिकारी रत्ना सुतार, रोहिणी चौगुले आदी उपस्थित होते.

🛑आजरा येथे जनसुरक्षा विधेयक विरोधात, तहसीलदार यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

शासनाने नवीन बनलेला
लोकशाही विरोधी, विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावे. कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करावी.
या कायद्याने जनतेच्या लोकशाही अधिकारांना सुरुंग लावायचा प्रयत्न केला जात आहे. सरकार शहरी नक्षलवाद संपुष्टात आणण्याच्या नावाखाली जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करणार्या प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे.

त्याचबरोबर जनतेचे संविधानिक अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, त्यामुळे डावी आघाडी व सहयोगी पक्ष जाहीर निषेध करत आहे
या मागणीचे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक संघटना रामकुमार सावंत शशिकांत सावंत काॅ.शांताराम पाटील काॅ. संजय घाटगे, प्रा.सुरेश बुगडे, शिवाजी सावंत, नारायण भंडागे, निवृत्ती मिसाळे, महादेव होडगे, जोतीबा चव्हाण, ज्ञानदेव गुरव, मनप्पा बोलके याच्यासह परिवर्तन वादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
