🛑 मलिग्रे येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न.
🛑गिरणीकामगार संघटना वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन..
🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.
🛑 मलिग्रे येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

मलिग्रे ता आजरा येथील समाज मंदिरात रात्री बारा वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती , मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून बुध्द वंदना घेण्यात आली. यावेळी आजरा साखर कारखाना संचालक अशोक तर्डेकर यांनी डाॅ.बाबासाहेबाच्या कर्तुत्वाची माहिती देवून बाबासाहेबांचे विचार कृतीतून पुढे नेण्याचे सांगितले, यावेळी संजय घाटगे, विश्वास बुगडे, रामचंद्र कांबळे, जया कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांनी गाणी सादर केली. यावेळी उपसरपंच चाळू केंगारे, विष्णू कांबळे, शिवाजी कागिनकर, नेताजी कांबळे, छाया कांबळे, आक्काताई कांबळे याच्या सह महिला उपस्थित होत्या अभार बाळू कांबळे यांनी मानले.
🛑गिरणीकामगार संघटना वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन..
आजरा.- प्रतिनिधी.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार ऑफिस मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर फोटो पुजन करून, बुध्द वंदना घेण्यात आली. यावेळी काशिनाथ मोरे यांनी साध्या सोप्या भाषेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले. आजरा साखर कारखाना संचालक अशोक तर्डेकर यांनी शिक्षणा शिवाय तर्णोपाय नाही. बाबासाहेबांनी शिक्षणातून गुणवत्ता मिळवत मानवतेचा संदेश संविधानाच्या मधून दिला आहे .असे मत व्यक्त केले. यावेळी गिरणीकामगाराचा वारसदार म्हणून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहीले बद्दल काॅ शांताराम पाटील याचे हस्ते तर्डेकर याचा सत्कार करणेत आला . यावेळी काॅ. शांताराम हारेर , मनप्पा बोलके, सुरेश दिवेकर महादेव होडगे, हिंदूराव कांबळे, दौलती राणे, शिवाजी कागिनकर याच्यासह गिरणीकामगार उपस्थित होते. आभार संजय घाटगे यांनी मानले.

🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.
आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम के. डी.सी.सी. बॅंक संचालक व कारखान्याचे बॅंक प्रतिनिधी सुधीर देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी व्हाईस चेअरमन सुभाष देसाई, तज्ञ संचालक, रशिद पठाण कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.