हवालदार अमित शिंदे – मुगळी ता. गडहिंग्लज सेवा निवृत्त.- परिसरातून हजारो नागरिकांच्या शुभेच्छांचा वर्षाव – सत्कार समारंभ संपन्न.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

गडहिंग्लज मुगळी येथील सी. आर. पी. एफ दलातील २१ वर्षे यशस्वीपणे व उत्कृष्टरित्या देशसेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल आजी-माजी सैनिक व अर्धसैनिक बल संघटना भगवा रक्षक तरुण मंडळ, संघर्ष तरुण मंडळ शिवाजी संघ, श्रीनगर ग्रुप व गांधीनगर ग्रुप मुगळी ग्रामस्थ यांच्या वतीने निवृत्त सैनिक अमित शिंदे यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ दि. १३/४/२०२५ रोजी सांस्कृतिक भवन न्यू इंग्लिश स्कूल मुगळी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

आजरा तालुक्यातील भादवण हायस्कूल येथील निवृत्त शिक्षक तुकाराम मल्लाप्पा शिंदे सर यांचे चिरंजीव २००४ मध्ये सी. आर. पी. एफ मध्ये भरती २००४ ते २००५ टेनींग २००५ ते २००७ आसाम २००७ ते २०१३ छत्तीसगड,२०१३ ते २०१८ श्रीनगर ( जम्मू काश्मीर ) २०१८ ते २०२० मध्येप्रदेश, २०२० ते २०२४ बंगलोर, २०२४ ते ३१ मार्च श्रीनगर ( जम्मू काश्मीर ) व ३१ मार्च २०२५ मध्ये हवालदार पदावरून देश सेवेतून सेवानिवृत्त अशी २१ वर्ष देश सेवेतून सेवानिवृत्त झालेले अमित शिंदे यांचा सत्कार व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी आजरा गडहिंग्लज तालुक्यातील मित्रपरिवार सह मुगळी गावातील नागरिक यांनी सेवापूर्ती सत्कार समारंभ कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी आजी-माजी सैनिक संघटनेचे कुमार पाटील तुकाराम महाडिक, सह सर्व सदस्य, संकेश्वर साखर कारखान्याचे संचालक सोमगोडृडा ओरबळे, गोड साखर चे माजी संचालक रमेश ओरबळे, मुगळीचे सरपंच मलिकअर्जुन ओरबळे सह उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, संघर्ष ग्रुपचे बाळासाहेब महाडिक, सागर वाघ, प्रवीण शिंदे सह सर्व सदस्य भगवा रक्षक मंडळाचे मकरंद शिंदे, राहुल शिंदे सह सर्व सदस्य.
भादवण येथील माजी सरपंच संजय पाटील, तसेच शैलेश मुळीक, हरीश देवरकर, लक्ष्मण सुतार, गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, पाहुणे मंडळी या सत्कार समारंभाचे निमंत्रक सौ मनाली अमित शिंदे, कु वैष्णवी शिंदे, वेदांत शिंदे, तसेच शंकर ढबाळे, सदानंद गावडे, सचिन हाळवणकर, बाळासाहेब शिंदे, विक्रम शिंदे, संतोष, जाधव, प्रेमजीत महाडिक, विश्वनाथ मुसळे, सतीश शिंदे, पांडुरंग पोवार, शेखर मांग, रघुनाथ धनवडे, सचिन खडके, प्रदिप चौगुले, प्रेमजीत महाडीक, अमोल जाधव, अजित चौगुले सह समस्त शिंदे परिवार, शिवाजी संघ मुगळी आदी उपस्थित होते. हवालदार अमित शिंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
चौकट

यावेळी सह्याद्री न्युज मराठी महाराष्ट्र चॅनलशी बोलताना माजी सैनिक हवालदार अमित शिंदे म्हणाले आजचा माझा सेवापूर्ती सत्कार समारंभ ग्रामस्थ मित्रमंडळी विविध मंडळे, आजी-माजी सैनिक यांनी आयोजित करून खरोखर एका सैनिकाचे महत्व समाजामध्ये किती अभिप्राय आहे. आजचा दिवस माझ्यासाठी अस्मरणीय असेल आज मला भारावून जाण्यासारखे क्षण अनुभवता आले. माझ्यावरील व एका सेवा निवृत्त सैनिकावरील प्रेम खऱ्या अर्थाने काय असत हे समजलं व देश सेवेत राहुन मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली हेच मी भाग्य समजतो. यामध्ये माझे आई – वडीलासह अनेकांचा आशीर्वाद व मार्गदर्शन मला मिळाले आज मी धन्य झालो.. यापुढेही सामाजिक कार्यात अग्रेसर राहीन असे बोलताना निवृत्त माजी सैनिक श्री शिंदे म्हणाले.