दीपस्तंभ फौंडेशनचे कार्य कौतुकास्पद – कत्तलीसाठी नेण्यात येणारी पाच तान्ही वासरांना सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने दिला पुनर्जन्म.
आजरा.- प्रतिनिधी.
दीपस्तंभ फौंडेशन व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने कत्तलीसाठी नेण्यात येणारी पाच तान्ही वासरांना पुनर्जन्म मिळाला आहे. १० एप्रिल रोजी विनापरवाना कत्तलीसाठी नेण्यात येणारी पाच तान्ही वासरे ताब्यात घेण्यात आली.
त्यादिवशी कोल्हापूर येथे पांजरपोळ व इतर गोशाळेत त्वरित जागा उपलब्ध होत न्हवती वेळ न घालवता सौ. जानकीताई सातोसकर मडगांवकर उपाध्यक्ष भाजपा पुणे शहर, सेविका राष्ट्र सेवा समिती, यांनी प्रथम जेष्ठ पत्रकार ज्योतीप्रसाद सावंत यांच्याशी संपर्क साधून आजरा पोलीस स्टेशनचे सपोनि नागेश यमगर यांना संपर्क साधला रीतसर वासरे जानकीताईच्या ताब्यात देण्यात आली.
वासरांना दोन दिवस सुखरूप स्थळी ठेवण्यात आले गोशाळेत सोडताना खर्च जानकीताई सातोसकर यांच्या दीपस्तंभ फौंडेशन तर्फे करण्यात आला. व्यापारी अभिषेक रोडगी यांनीही एकवेळ दुध स्व: खर्चाने पाठवले. लाटगावचे उपसरपंच संदेश दळवी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. वासरे सुखरूप कागल येथे गोशाळेत सुपूर्द केली यासाठी बजरंग दल आजरा राहुल नेवरेकर, स्वप्निल सावंत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्य केलेल्या सर्वं हिंदुत्ववादयांचे सहकार्य लाभले. लवकरच आजऱ्यात गोशाळा सुरवात केली जाणार आहे. अशी माहिती सौ सातोसकर मडगांवकर यांनी देत
गोहत्या मुक्त हिंदुस्थान घडविण्यासाठी ‘गोरक्षणार्थ धर्मकार्यात सर्वांनी सहभागी व्हावे. असे आवाहन केले आहे.