Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रसहकार भारती आजरा तालुका अध्यक्षपदी निवड- डॉ. अनिल देशपांडे यांचा आजरा सूतगिरणी...

सहकार भारती आजरा तालुका अध्यक्षपदी निवड- डॉ. अनिल देशपांडे यांचा आजरा सूतगिरणी वतीने सत्कार.

सहकार भारती आजरा तालुका अध्यक्षपदी निवड- डॉ. अनिल देशपांडे यांचा आजरा सूतगिरणी वतीने सत्कार.

आजरा.- प्रतिनिधी.

आण्णा भाऊ आजरा सूतगिरणीचे व्हा. चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांची नुकतीच सहकार भारती आजरा तालुका अध्यक्षपदी निवड झालेबददल आजरा सूतगिरणी येथे सत्कार करणेत आला.

आण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक आण्णा चराटी यांचे हस्ते व सूत गिरणीच्या अध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णा चराटी यांचे प्रमुख उपस्थितीत हा सत्कार संपन्न झाला. याप्रसंगी डॉ. अनिल देशपांडे सत्काराला उत्तर देताना म्हणाले. सहकार भारती ही संस्था सहकारातील सर्व संस्थांची देशपातळीवरील संघटना आहे. जिचे मुख्य कार्य हे सहकारातील संस्थाना त्यांच्या कामकाजातील अडचणी दूर करणेसाठी तांत्रिक आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करणे व त्यांचे पदाधिकारी अधिकारी यांना सतत मार्गदर्शन करत राहणे तसेच सहकार्य करणे तसेच देशपातळीवरील राज्यस्तरावरील वित्तीय संस्थांकडून निधी उभारणी करीता मार्गदर्शन करणे तसेच सहकार्य करणे तसेच तालुका पातळीवरील सेवा संस्था दुध संस्था पतसंस्था त्याचप्रमाणे महिला बचत गटांकरीता सहकाराचे माध्यमातून मोठे कार्य करणेचा मानस आहे. शेतकरी भूमिहीन वनवासी कमी उत्पन्न गटातील बेरोजगार तरूण यांचेकरीता विविध उपक्रमाचे माध्यमातून मोठ्या प्रमाणात कार्यरत राहणार आहोत. यासाठी आण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक आण्णा चराटी यांचे मोठे सहकार्य अपेक्षीत आहे‌. व ते मिळणार हा विश्वासदेखील आहे.

सहकार भारती आजरा तालुका कार्यकारणीवर माझी निवड झालेबददल आपण माझे कौतुक केले त्यासाठी आभार मानले
याप्रसंगी संस्थेचे संचालक जयसिंग देसाई अविनाश सोनटक्के, नारायण मुरूकटे, जी. एम. पाटील, राजु पोतनीस, डॉ. संदीप देशपांडे, शशिकांत सावंत, मालुताई शेवाळे, मनिषा कुरूणकर, अनिकेत चराटी, हसन शेख, यांचेसह जनरल मॅनेजर अमोघ वाघ अधिकारी दत्तात्रय दोरूगडे, सचिन सटाले उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.