Homeकोंकण - ठाणेधनंजय मुंडे यांना मोठा धक्का!.- कोर्टाचा करुणा शर्मांच्या बाजूने निकाल.- धनंजय मुंडेंची...

धनंजय मुंडे यांना मोठा धक्का!.- कोर्टाचा करुणा शर्मांच्या बाजूने निकाल.- धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली🟥सपोनि. पो. निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड:- दोषी बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरला.- 11 एप्रिलला ठोठावणार शिक्षा..

🟥धनंजय मुंडे यांना मोठा धक्का!.- कोर्टाचा करुणा शर्मांच्या बाजूने निकाल.- धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली
🟥सपोनि. पो. निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड:- दोषी बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरला.- 11 एप्रिलला ठोठावणार शिक्षा..

मुंबई :- प्रतिनिधी.

करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. माझगाव कोर्टाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली आहे. करुणा मुंडे यांना दिलासा देत न्यायालयाने त्यांची दोन लाखांची पोटगी कायम ठेवली आहे.या आधी वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने करुणा शर्मा यांना दोन लाखांची पोटगी देण्यात यावी असा निकाल दिला होता. त्या विरोधात धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.

🔴शनिवारी झालेल्या अंतिम सुनावणीवेळी करुणा शर्मा यांच्याकडून महत्वाची कागदपत्रे पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आली. धनंजय मुंडेंच अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र या दोन महत्वाची कागदपत्रांचा पुराव्यात समावेश करण्यात आला. याच पुराव्यांच्या आधारे करुणा मुंडे यांना न्यायालयाने दिलासा दिला.

🟥माझगाव कोर्टाच्या निकालात काय म्हटलंय?

न्यायालयाने धनंजय मुंडेंची आव्हान याचिका फेटाळली.
⭕करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
⭕करुणा शर्मांना पोटगीचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम राहणार.
⭕धनंजय मुंडेंना करुणा शर्मा यांना दोन लाखांची पोटगी द्यावी लागणार.

करुणा शर्मा मुंडे यांनी न्यायालयात लग्नासंदर्भातलं धनंजय मुंडे यांचं स्वीकृतीपत्रही सादर केलं. या पत्रात धनंजय मुंडे यांनी 9 जानेवारी 1998 रोजी वैदिक पद्धतीने करुणा यांच्याशी लग्न केल्याचा उल्लेख आहे. तसंच आई-वडिलांच्या दबावाखाली येऊन राजश्री यांच्यासोबत दुसरं लग्न केल्याचाही उल्लेख पाहायला मिळतोय. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी मात्र हे स्वीकृतीपत्र खोटं असल्याचं म्हणत सर्व दावे फेटाळले.

🔴करुणा मुंडे यांनी कोर्टात सादर केले लग्नासंदर्भातले स्वीकृतीपत्र

🔺धनंजय मुंडे यांचे स्वत:चे स्वीकृतीपत्र असल्याचे सांगत करुणा मुंडे यांनी कोर्टात ते सादर केलं.
🔺स्वीकृतिपत्रात करुणा मुंडेंशी धनंजय मुंडे यांनी 9 जानेवारी 1998 रोजी वैदिक पद्धतीने लग्न केल्याचा उल्लेख
🔺आई-वडिलांच्या दबावाखाली येऊन मी दुसरे लग्न केले, पण करुणा मुंडेंसोबत घटस्फोट घेणार नाही असाही उल्लेख.
🔺मी करुणा मुंडे आणि माझ्या दोन्ही मुलांसोबत राहणार असल्याचा स्वीकृतिपत्रात उल्लेख.
🔺हे स्वीकृतीपत्र खोटे असल्याचा धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा कोर्टात दावा.

करुणा शर्मांचे खळबळजनक आरोप

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केले आहेत. मला जो प्रेमात अडकवून लग्न करेल त्याला धनंजय मुंडे 20 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला. यात त्यांनी धनंजय मुंडेंसह घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्करवर यांच्या नावांचाही उल्लेख शर्मा यांनी केला.

आपल्याला मोठमोठ्या दिग्दर्शकांकडून हिरॉईनची ऑफर होती असं करुणा शर्मा म्हणाल्या. धनंजय मुंडे यांनी आपल्या बदनामीचा कट रचल्याचा दावाही करुणा शर्मा यांनी केला. हे आरोप करताना करुणा शर्मा यांना अश्रू देखील अनावर झाल्याचं पहायला मिळालं.

🟥सपोनि. पो. निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड:- दोषी बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरला.- 11 एप्रिलला ठोठावणार शिक्षा..

मुंबई :- प्रतिनिधी

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी, बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात न्यायालयाने तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त करत, अभय कुरुंदकरचे नाव राष्ट्रपती पदकासाठी सुचवणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे.

तपासातील ढिसाळपणावरही कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. या खटल्यात महेश पळणीकर आणि कुंदन भंडारी यांच्यावर हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, 11 एप्रिल 2025 रोजी सर्व आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाने अश्विनी बिद्रे यांचे पती आणि मुलीला त्या दिवशी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

💥पोलिसांवर कोर्टाचा हल्लाबोल

न्यायालयाने तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर कडाडून टीका केली. हत्या झाल्यानंतर दोन वर्षांनी शोधमोहीम, एक वर्षानंतर आरोपींचे मोबाइल ताब्यात घेणे आणि मुख्य आरोपी अभय कुरुंदकरचे नाव राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करणे या गंभीर चुका न्यायालयाने निदर्शनास आणल्या. “हत्या करणाऱ्या आरोपीला पदकासाठी शिफारस करणे हे अत्यंत गंभीर आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसतो,” असे कोर्टाने सुनावले. 11 एप्रिल 2016 रोजी घडलेल्या या हत्याकांडाचा खटला अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयात सात वर्षे चालला, ज्यात 80 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.

🟥👉उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाने तपासाला गती

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले की, अभय कुरुंदकरने आपल्या पदाचा गैरवापर करत गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर यांनी मृतदेहाचे तुकडे करून वसईच्या खाडीत फेकले, तर राजेश पाटील हत्येनंतर घटनास्थळी उपस्थित होता, पण प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी नव्हता. “उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच तपासाला खरी दिशा मिळाली,” असे घरत म्हणाले. गुन्हा 1 जानेवारी 2017 रोजी दाखल झाला, तर अभय कुरुंदकरला एक वर्षानंतर 7 डिसेंबर 2017 रोजी अटक झाली. “तत्कालीन उच्चपदस्थांनी दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा केला. याबाबत मी सर्व रेकॉर्डवर आणणार आहे,” असे त्यांनी ठणकावले.

🛑मीरा रोडच्या घरात हत्येचा थरार

अभय कुरुंदकरने 11 एप्रिल 2016 च्या रात्री मीरा रोड येथील आपल्या घरात अश्विनी बिद्रे यांची हत्या केली. त्यानंतर सहकारी राजू पाटील, कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर यांच्या मदतीने मृतदेहाचे वूड कटरने तुकडे केले. हे तुकडे काही काळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर वसईच्या खाडीत टप्प्याटप्प्याने फेकून दिले. राजू पाटीलला 10 डिसेंबर 2017 रोजी, तर भंडारी आणि पळणीकर यांना नंतर अटक झाली. तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावच्या अश्विनी बिद्रे यांना सात वर्षांनंतर न्याय मिळाला असून, या प्रकरणातील शिक्षा सुनावणीची सर्वांना उत्सुकता आहे.

🔴हत्येचे कारण काय?

या हत्येचे कारण वैयक्तिक वादातून उद्भवले असावे, असे तपासातून समोर आले आहे. अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांच्यातील संबंधांबाबत तपासात काही माहिती समोर आली होती, ज्यात त्यांच्यातील वैयक्तिक मतभेद आणि तणाव हा हत्येचा संभाव्य हेतू असू शकतो असे सूचित झाले होते. असा दावा आहे की अभय कुरुंदकर याने अश्विनी यांना त्यांच्यासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, ज्याला तिने नकार दिला होता, आणि यातून उद्भवलेल्या रागातून ही हत्या घडली असावी.

तथापि, हत्येचे नेमके कारण आणि त्यामागील परिस्थिती याबाबत संपूर्ण स्पष्टता तपासातून आणि न्यायालयीन प्रक्रियेतून अद्याप पूर्णपणे उघड झालेली नाही. या प्रकरणात अभय कुरुंदकर याला दोषी ठरवण्यात आले असून, त्याची शिक्षा ११ एप्रिल २०२५ रोजी ठोठावली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.