एनसीडीसीच्या ११२ कोटीचा कर्जाचा विनयोगाचे नियोजन व्हावे.- कामगारांच्या अर्ध्या पगाराचा विचार व्हावा.- आजरा साखरला उभाठा सेनेचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
स्व. वसंतराव देसाई सहकारी साखर कारखाना शेतकरी व कामगारांच्या विविध मागणीबाबत आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
काही दिवसांपुर्वी आजरा कारखान्याला एनसीडीसी कडून १२२ कोटी कर्ज मंजूर झाले त्याबद्दल चेअरमन व सर्व संचालकचे अभिनंदन । या १२२ कोटी कर्जाचे योग्य नियोजन आपल्याकडून व्हावे ही विनंती. यामध्ये ज्या कारखान्याच्या कामगारांनी कारखाना अडचणीत असताना ५०% पगार कपातीचा निर्णय घेवून टप्या – टप्याने पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला त्या कर्मचाऱ्यांचा करार संपला आहे.
त्यामुळे त्यांना पण पूर्ण पगार देण्यात यावा याच बरोबर ज्या सभासद व उत्पादकांनी साखर लवकरात लवकर यावी.

त्यामुळे उत्पादक व समासादामध्ये मारखान्याबद्दल समाधानाचे वातावरण निर्माण होईल व पुढील हंमामाकरीता जास्त ऊस अधिक प्रमाणात होऊन चांगले क्रशिंग होईल याकडे वाटचाल असावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर ता. प्रमुख युवराज पोवार, उप. प्रमुख शिवाजी आढाव, विभाग प्रमुख दयानंद भोपळे सह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
