श्री. राम नवमीच्या निमित्ताने – श्रीराम नवमीच्या निमित्तानेश्री. काळभैरव ग्रुप गडहिंग्लज आजरा.- प्रतिनिधी.
श्री काळभैरव ग्रामदैवत गडहिंग्लज ग्रुप व
गुड्डादेवी ग्रामदैवत भडगाव मॉर्निंग वॉक टिमचा श्री रामनवमीच्या निमित्ताने आजरा येथील रामतीर्थ तीर्थस्थळ या ठिकाणी पायी चालत येऊन दर्शन घेण्याचा उपक्रम राबवला जातो. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील भडगाव ते गडहिंग्लज व गडहिंग्लज ते आजरा रामतीर्थ या ठिकाणी पायी येऊन दर्शन घेतले जाते. गडहिंग्लज परिसरातील रामभक्त मंडळी सहभाग घेतात.
यामध्ये दोन्ही ग्रुपमधील सदस्य सदाशिव खवणेकर, भीमराव शेवाळे, प्रताप सरदेसाई, विजय आजरी, नंदकुमार शेळके, मल्लाप्पा चौगुले, अण्णासो पाटील, मनोजकुमार शेळके, उदय पुजारी, बाळासो कोडोळी सह श्री. काळभैरव ग्रुप गडहिंग्लज व गुड्डादेवी ग्रामदैवत भडगाव दोन्ही ग्रुपचे सर्व सदस्य सदस्य यामध्ये हिरारीने सहभाग घेतात..