आजरा तालुक्यात नाम. हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम.
( मडिलगेत विद्यार्थ्यांना वह्या पेन वाटप.)
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा – येथील उत्तुर जि. प. येथील राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यावतीने नाम. हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. आजरा मडिलगे येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या पेन तर आजरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळे वाटप. आजरा साखर कारखान्याचे संचालक दिपक देसाई तसेच राष्ट्रवादीचे युवा ता. अध्यक्ष अनिकेत कवळेकर सह कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला.

स्वागत मडिलगे हायस्कूलचे मुख्याध्यापक सामंत सर यांनी केले तर प्रास्ताविक सुशांत गुरव यांनी केले.

यावेळी बोलताना संचालक श्री. देसाई म्हणाले नाम. हसन मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना उदंड आयुष्य लाभाव यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पेन व रुग्णांना फळे वाटप केले. मडिलगे गावचा कायापालट ना. मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून झाला आहे. यापुढील काळात देखील आपण आपल्या विभागाचा व गावचा विकास साधण्यासाठी त्यांना बळ दिले पाहिजेत. कारण त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो. अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. असे बोलताना श्री देसाई म्हणाले.

यावेळी सरपंच बापू निऊगरे, उपसरपंच पांडुरंग जाधव, युवा नेते अनिकेत कवळेकर सह गावातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच गणपतराव आळरगुंडकर, सखाराम येसने, भीमराव दोरुगडे, किरण सुतार, बाळू सुतार, भाऊसाहेब पाटील, श्री. ढोकरे सह पदाधिकारी कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी, माता -पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. कवळेकर यांनी आभार मानले.

