Homeकोंकण - ठाणेसपोनि - अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक...

सपोनि – अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर दोषी तर राजू पाटीलची निर्दोष सुटका.🛑राजकारण्यांवर जलद गतीने खटले चालवा.- माजी आय.पी.एस.(I.P.S.) अधिकारी किरण बेदी यांंचे मत..

🛑सपोनि – अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर दोषी तर राजू पाटीलची निर्दोष सुटका.
🛑राजकारण्यांवर जलद गतीने खटले चालवा.- माजी आय.पी.एस.(I.P.S.) अधिकारी किरण बेदी यांंचे मत..

पनवेल :- प्रतिनिधी.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. मागील सात वर्षांपासून या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केजी पांडेवाल यांनी निकाल सुनावला आहे. या प्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर हाच दोषी असल्याचं म्हटलं आहे. तो कलम ३०२ अंतर्गत दोषी आढळला आहे. महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी हे मृतदेहची विल्हेवाट लावण्यासाठी सहभागी असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. तर आरोपी राजू पाटील याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणी ११ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

अश्विनी ब्रिदे 11 एप्रिल 2016 रोजी बेपत्ता झाल्या होत्या. घटनेच्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास त्या अभय कुरूंदकरला भेटायला पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. यानंतर अभय कुरूंदकर हे बिद्रे यांना कारमध्ये घेऊन भाईदरच्या दिशेने रवाना गेला. याचवेळी कारमध्येच कुरूंदकरने बिद्रे यांची गळा दाबून हत्या केली ही घटना 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 6. 41 ते रात्री 11.11 च्या दरम्यान घडली. त्यानंतर रात्री 11.18 वाजता बिद्रे यांचा मोबाईल बंद झाला. हत्या केल्यानंतर आरोपीनं लाकडं कापायच्या कटरने अश्विनी यांच्या शरीराचे तुकडे केले. कुरूंदकर आणि फळणीकरने राजू पाटील आणि खासगी चालकाला सोबत घेत मध्यरात्री अश्विनी बिद्रेचे तुकडे कारमधून वसईच्या खाडीत फेकला. असा आरोप होता.

🛑राजकारण्यांवर जलद गतीने खटले चालवा.- माजी आय.पी.एस.(I.P.S.) अधिकारी किरण बेदी यांंचे मत..

पुणे : – प्रतिनिधी

देशाच्या व्यवस्थेत मूलभूत सुधारणा करायच्या असतील तर भ्रष्ट राजकारण्यांवर जलद गतीने खटला चालवणे गरजेचे आहे.
नेते प्रामाणिक असतील तर व्यवस्था आणि जनताही प्रामाणिक राहते.
त्यामुळे भ्रष्ट नेत्यांवर तत्काळ कारवाई करून त्यांना थेट तुरुंगात धाडायला हवे.
अशा नेत्यांना पुन्हा निवडणूक लढवता येऊ नये म्हणून कायदा करण्यात यावा.
असे मत माजी आय.पी.एस.(I.P.S.) अधिकारी किरण बेदी यांनी व्यक्त केले

किरण बेदी म्हणाल्या.-

महिलांनी घराबाहेर पडायला हवे
बाहेरच्या जगातील संघर्ष सोसला पाहिजे
त्यांनी मैदानी खेळ गिर्यारोहनासारख्या उपक्रमांमध्ये सहभाग घ्यायला हवा.
घराच्या चार भिंतींमध्ये राहून महिलांना त्यांची प्रगती साधता येणार नाही.

त्यांना बाहेर पडून संघर्ष करावाच लागेल
त्यासाठी कुटुंबातूनही प्रोत्साहन
पाठबळ मिळायला हवे
तेव्हाच मुलींना खऱ्या अर्थाने यशस्वी होता येईल
‘नेतृत्वगुण घडवावे लागत नाहीत.
त्यांची ओळख व्हायला हवी
महिलांमध्ये नेतृत्वासाठीचे अनेक आवश्यक गुण अंगभूत प्राप्त असतात

त्यांना गरज आहे ती, स्वत:वर विश्वास ठेवून चिकाटीने काम करण्याची

जिद्दीने पुढे जाण्याची.

असेही किरण बेदी म्हणाल्या
पंतप्रधानांच्या गाडीला क्रेनने उचलणे
तिहार जेलमध्ये केलेल्या ‘विपश्यने’च्या उपक्रमांंची माहिती देतानाच बेदी यांनी अधिकारी म्हणून काम करताना आलेेले अनुभव सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.