HomeUncategorizedझारखंडमध्ये दोन मालगाड्यांचा भीषण अपघात.- दोन्ही लोको पायलटचा मृत्यू.🟥टीसीने रेल्वे स्थानकावरच आयुष्य...

झारखंडमध्ये दोन मालगाड्यांचा भीषण अपघात.- दोन्ही लोको पायलटचा मृत्यू.🟥टीसीने रेल्वे स्थानकावरच आयुष्य संपवले.- धावत्या मालगाडीसमोर उडी घेत केली आत्महत्या.🟥फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट.- १७ जणांचा मृत्यू

🛑झारखंडमध्ये दोन मालगाड्यांचा भीषण अपघात.- दोन्ही लोको पायलटचा मृत्यू.
🟥टीसीने रेल्वे स्थानकावरच आयुष्य संपवले.- धावत्या मालगाडीसमोर उडी घेत केली आत्महत्या.
🟥फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट.- १७ जणांचा मृत्यू

💥झारखंडमध्ये दोन मालगाड्यांचा भीषण अपघात.- दोन्ही लोको पायलटचा मृत्यू.

रांची :- वृत्तसंस्था

Oplus_131072

झारखंडमधील बरहेट येथे दोन मालगाड्यांची जोरदा धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. फरक्का येथून ललमटियाकडे रेल्वे मालगाडी निघाली होती. त्यावेळी बरहेट येथे आधीपासूनच उभ्या असलेल्या दुसऱ्या एका मालगाडीला या मालगाडीची धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही मालगाड्यांच्या इंजिनचा चेंदामेंदा झाला. यातच आग लागली त्यामुळे येथील परिस्थिती अधिकच गंभीर झाली. या दोन्ही मालगाड्या कोळशाची वाहतूक करत होत्या.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. यानंतर आग आटोक्यात आणता आली. या अपघातात दोन्ही लोको पाटलट्सचा मृत्यू झाला. चार जण जखमी झाले. जखमींमध्ये रेल्वे कर्मचारी आणि सीआयएसएफ जवान आहेत. या सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघात कशामुळे झाला यामागे काय कारण होते याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर मालगाडी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात. सध्या रेल्वे लाइनवर वाहतूक बंद करण्यात आली आहे. रेल्वे विभागाकडून या घटनेचा तपास केला जात आहे. दोन्ही मालगाड्या एकाच रुळावर कशा आल्या या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अपघातानंतर येथे धावपळ उडाली होती. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाबरोबर मदतकार्य सुरू केले.

🟥टीसीने रेल्वे स्थानकावरच आयुष्य संपवले.- धावत्या मालगाडीसमोर उडी घेत केली आत्महत्या

अकोला :- प्रतिनिधी.

अकोल्यातील मुर्तिजापूरच्या रेल्वे स्थानकावर तिकीट चेकरने (टीसी) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुर्तिजापूर येथून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीसमोर उडी घेत या तिकीट चेकरने आयुष्य संपवले असल्याची माहिती समोर आली आहे. सुमेध मेश्राम असे या आत्महत्या करणाऱ्या तिकीट चेकरचे नाव आहे. या घटनेने अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुर्तिजापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घरगुती तणावातून सुमेध मेश्राम यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार 40 वर्षीय सुमेध मेश्राम हे घरगुती कारणामुळे तणावात होते. फलाट क्रमांक १ वर कर्तव्य बजावत असताना सुमेध मेश्राम यांनी अचानक मुर्तिजापूरवरून भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडी समोर उडी घेतली. यात सुमेध मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सुमेध मेश्राम यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना कळवण्यात आली व त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.

🟥गुजरातमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट.- १७ जणांचा मृत्यू

अहमदाबाद :- वृत्तसंस्था

Oplus_131072

गुजरातच्या बसनकांठामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुरुवातीला सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर आता हा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, संपूर्ण कारखान्याचे बांधकाम कोसळलं. त्याखाली देखील काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसामध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासह एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. स्फोटानंतर हा कारखान्याचा काही भाग कोसळला. स्फोटानंतर भिंती आणि छत कोसळल्याने अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. माध्यमांच्या वृत्तानुसार, बॉयलरचा स्फोट झाल्याने फटाक्यांच्या कारखान्यात आग लागली. आतापर्यंत सात मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व मजूर मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्फोटावेळी कामगार कारखान्यात काम करत होते. अचानक स्फोट झाल्याने मजुरांना पळता आलं नाही. हा स्फोट इतका भीषण होता की अनेक कामगारांच्या शरीराचे भाग दूरवर फेकले. कारखान्याच्या पाठीमागील शेतात शरीराचे काही भागही आढळून आले. आज सकाळी आम्हाला डीसा येथील औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळाली. अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. या घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला. चार जखमी कामगारांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोट इतका मोठा होता की कारखान्याचा स्लॅब कोसळला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शोध मोहीम राबवत आहोत,” अशी माहिती बनासकांठाचे जिल्हाधिकारी मिहीर पटेल यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.