Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा शहर व उपनगरातील तुंबलेल्या गटारी स्वच्छ व पाणीपुरवठा सुरळीत करावा -...

आजरा शहर व उपनगरातील तुंबलेल्या गटारी स्वच्छ व पाणीपुरवठा सुरळीत करावा – समीती व नागरिकांचे निवेदन.

आजरा शहर व उपनगरातील तुंबलेल्या गटारी स्वच्छ व पाणीपुरवठा सुरळीत करावा – समीती व नागरिकांचे निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहर व उपनगरातील तुंबलेल्या गटारी स्वच्छ व पाणीपुरवठा सुरळीत करावा याबाबत अन्याय निवारण समितीने व नागरिकांनी आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सध्या वळीव पाऊस चालू झाला असून शहरातील व उपनगरातील बरीच नवीन व जुनी गटारी साफ नसलेले गटारी तुंबून राहील्या आहेत. सदर पाणि सांडमिश्रीत असलेने दुर्घधी येत असून त्या मध्ये डासांची उत्पत्ती वाढून रोगराई पसरलेली आहे. त्याच प्रमाणे शहरातील नवीन बांधकामे चालू असून त्यांचे बांधकाम साहित्यामुळे शेजारच्या गटरी भरलेल्या असलेने सांडपाणी व पावसाचे रस्त्यावरून वाहते अगर साचून रहाते तेंव्हा सदर बांधकाम धारकास नोटीस काढून ८ दिवसांत गटरी रिकाम्या करून देण्यासाठी सूचना देण्यात याव्यात. तेंव्हा नगरपंचायत मार्फत सर्वेक्षण करावे व सांडपाण्याचा योग्य निचरा होणे विषयी कार्यवाही करावी.असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी अध्यक्ष परशुराम बामणे, पांडुरंग सावतरकर, गौरव देशपांडे, जावेद पठान, जोतिबा आजगेकर, सह समीतीचे सदस्य व नागरिकांच्या सह्या आहेत
.

चौकट.

आमचे निदर्शनास आलेली खालील प्रमाणे ठिकाणे आहेत.

१) समर्थ कॉलनी मधील मोरवाडकर गुंजाटी आजगेकर यांचे समोरील गटर.
२) आयडीयल कॉलनी मधील युवराज जाधव यांचे घरासमोरील गटर.
३) वाडा गल्ली मधील खामकर पत संस्था लगतचे गटर.
४) चाफेगल्ली मधील श्री. शिवगंड यांचे घरासमोरील गटर.
५) एकता कॉलनी मधील गटर (भंगी बोळ) साफ करून मिळावा.
६) नाईक गल्ली पाण्याची नविन नळ जोडणी करून मिळावीत जुने नळ जोडणी मधुन पाणीपुरवठा बंद झाला आहे.
७) रवळनाथ कॉलनी मधील पुर्वेकडील पाईपलाईनची शेवटची चार कनेक्शन नळामध्ये माती साचलेने पुर्ण बंद आहेत. ती चालू करुन मिळावीत.
८) रवळनाथ कॉलनी मध्ये अंगणवाडी जवळील डी.पी. चे शेजारी पाईप लाईनला गळती लागलेली आहे. त्याचे पाणी पुर्ण रस्त्यावर वहात असून दिवसभर चिखल होत आहे. ती थांबवणेत यावी.

चौकट.

यावेळी मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी.- पावसाळ्यापूर्वी आजरा शहरातील सर्व गटर पूर्णपणे साफ करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना व सुपरवायझर यांना C O साहेबांनी ताबडतोब आदेश दिले, येत्या पंधरा दिवसात सर्व गटर साफ करण्यात येईल असेही आश्वासन दिले. नाईक गल्लीच्या पाण्याच्या संदर्भात आजच कामगार पाठवून काम चालू करण्यात आले , सदर काम चार दिवसात पूर्ण करून नाईक गल्लीला नवीन कनेक्शन मधून दररोज पाणी देण्यात येईल असे आश्वासन दिले, त्याचबरोबर शहरातील स्वच्छ पाण्यासंदर्भात व आरोग्य संदर्भात विस्तारित समितीच्या सदस्यांशी व नागरिकांशी चर्चा झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.