Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रजनता बँक आजराला रु ७ कोटी ९५ लाखाचा नफा व रु ४००...

जनता बँक आजराला रु ७ कोटी ९५ लाखाचा नफा व रु ४०० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण🛑जनता गृहतारण संस्थेने केला शंभर कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण.

🛑जनता बँक आजराला रु ७ कोटी ९५ लाखाचा नफा व रु ४०० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण
🛑जनता गृहतारण संस्थेने केला शंभर कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण.

🛑जनता गृहतारण संस्थेने केला शंभर कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण.

आजरा.- प्रतिनिधी

जनता सहकारी बैंक लि आजरा या बँकेला सन २०२४-२०२५ साली रु ७ कोटी ९५ लाखाचा नफा झाला असून बँकेने रु ४०० कोटीचा टप्पा पूर्ण करत बँकेच्या मार्च २०२५ अखेर एकूण ठेवी रु ४०९ कोटी ९१ लाख, कर्ज रु २५९ कोटी ३६ लाख व गुंतवणुक रु १७५ कोटी ८० लाख इतक्या आहेत. बँकेने या वर्षात रु ४०० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करणेचा संकल्प केला होता. त्याला उदंड प्रतिसाद देत सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांनी बँकेबद्दल असलेला विश्वास व आत्मीयता सार्थ ठरविली आहे. बँकेचा एन पी ए शुन्य टक्के, सी आर ए आर १४.४१ टक्के व बँकेचा एकूण व्यवसाय रु ६६९ कोटी २८ लाख असून बँकेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, ठाणे, मुंबई व उपनगरे या जिल्हयात असून बँकेच्या एकूण २० शाखा कार्यरत आहेत. बँकेने सर्व प्रकारची अद्यावत टेक्नॉलोजी अमलात आणून सर्व अद्यावत डिजीटल सेवा ग्राहकांना देणेत यशस्वी ठरली आहे. बँकेने आजपर्यंत जे जे ठरविले आहे ते ते सर्व वेळेत पूर्ण केलेले आहे. त्यासाठी बँकेला लाभलेले कुशल नेत्रुत्व श्री मुकुंददादा देसाई व उच्च विद्याविभुशीत अनुभवी सीईओ श्री एम बी पाटील यांची कडक शिस्त व अतिशय स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळे बँकेने वेगवेगळया यशाचे टप्पे पूर्ण करत बँकेची घोडदोड सतत उंचावत ठेवली आहे. आजऱ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये इंटरनेट व लिज लाईनच्या खंडीत सेवेमुळे बँकेने बँकेचे डाटा सेंटर नव्याने कोल्हापूर येथे उभा केलेले आहे.

हे सर्व करत असताना बँकेने सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक व कर्मचारी यांना सर्व सुविधा देणेत समतोल राखला असून कर्मचाऱ्यांना यावर्षी १५ टक्के बोनस व रजेच्या पगाराची तरतुद केली आहे. नुकतेच रिझर्व बँकेने कल्याण व गारगोटी शाखेला मंजुरी दिली असून येणाऱ्या आर्थिक वर्षात अल्पावधीतच नवीन शाखा सुरु करुन ग्राहकांच्या सेवेत हजर होत असलेबाबतचे बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी व्यक्त केले. या यशामध्ये बँकेचे सर्व कर्मचारी व बँकेचे सर्व ग्राहक यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये रु ५०० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करणेचा मानस बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई व सीईओ एम बी पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी बँकेचे व्हा चेअरमन अमित सामंत, संचालक महादेव टोपले, रणजित देसाई, जयवंत शिंपी, बाबाजी नाईक, शिवाजी पाटील, विक्रमसिंह देसाई, जयवंत कोडक, संतोष पाटील, पांडुरंग तोरगले, महेश कांबळे, सौ रेखा देसाई, सौ नंदा केसरकर, संभाजी अस्वले- सीए व अॅड शंकर निकम. तसेच बँकेचे अधिकारी पी ए सरंबळे, एस एच चौगुले, एम वाय बैंक लि. सावंत, एन जी कुंभार व आय टी मॅनेजर एस बी पाटील उपस्थित होते.

🛑जनता गृहतारण संस्थेने केला शंभर कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या जनता सहकारी गृहतारण संस्थेने शंभर कोटी ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. संस्थेच्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा क्षण आहे. याकरिता संस्थेचे सन्मानीय सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांनी केलेल्या सहकार्याबददल संस्था सदैव ऋणी आहे. अशा भावना चेअरमन मारुती मोरे यांनी व्यक्त केल्या. वर्ष समाप्तीपूर्वीच संस्थेने शंभर कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केल्याने भविष्यात सभासद व कर्जदारांसाठी आणखीण काही चांगल्या योजना आखता येतील अशी माहिती देताना ते बोलत होते. मुख्य कार्यालयासह सात शाखांचा विस्तार असलेली ही संस्था माणसं जोडणारी संस्था म्हणून ओळखली जाते. संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र आणि आयएसओ मानांकन देखील संस्थेला मिळाले आहे. काटकसर आणि पारदर्शक कारभारामुळे संस्थेची विश्वासार्हता दिवसेंदिवस वाढत आहे. अत्यंत कमी कालावधीत जनता सहकारी गृहतारण संस्थेनं घेतलेली गरूड भरारी ही संचालक मंडळाच्या चोख कारभाराची पोचपावती आहे. असे त्यानी सांगितले.

यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन गणपतराव अरळगुंडकर, प्राचार्य प्रो. (डॉ) अशोक सादळे, प्रो. (डॉ) अशोक बाचुळकर, प्रो. (डॉ) तानाजी कावळे, प्रा. विनायक चव्हाण, प्रा. श्री मनोज देसाई, अॅड सुभाष डोंगरे, प्रा. बळवंत कडवाले, प्रा. सौ लता शेटे, सौ. डॉ. अंजनी देशपांडे, प्रा. सौ. नेहा पेडणेकर, मॅनेजर मधुकर खवरे, प्रशासन अधिकारी मारुती कुंभार आदि उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.