Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त १२ कोटी ३७ लाखाच्या ठेवी जमा.🛑वसंतराव देसाई...

आजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त १२ कोटी ३७ लाखाच्या ठेवी जमा.🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात तोडणी -वाहतुक करार शुभारंभ.🛑आजरा अर्बन बँकेचा १००० कोटी ठेवीचा टप्पा पूर्णस्वामी विवेकानंद संस्थेचे.- गुढीपाडवा मुहूर्तावर एकाच दिवशी ३ कोटी १७ लाख ठेव संकलन.

🛑आजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त १२ कोटी ३७ लाखाच्या ठेवी जमा.
🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात तोडणी -वाहतुक करार शुभारंभ.
🛑आजरा अर्बन बँकेचा १००० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण
स्वामी विवेकानंद संस्थेचे.- गुढीपाडवा मुहूर्तावर एकाच दिवशी ३ कोटी १७ लाख ठेव संकलन.

🛑आजरा अर्बन बँकेकडे गुढी पाडव्यानिमित्त १२ कोटी ३७ लाखाच्या ठेवी जमा.

आजरा.- प्रतिनिधी.

दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तब्बल १२ कोटी ३७ लाख रुपयांच्या ठेवी एका दिवसात जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. सध्या बँकेकडे १०१९ कोटी ७९ लाख रूपयाच्या ठेवी व ६४९ कोटी ६२ लाख रुपये कर्जे आहेत. त्याबाबत बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख मा.श्री. अशोकअण्णा चराटीसो, व्हा. चेअरमन मा.श्री. संजय चव्हाणसो व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले व सर्वांना बँकेच्या वतीने गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात तोडणी -वाहतुक करार शुभारंभ.

आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या पुढील सन २०२५-२६ या गळीत हंगामात ऊस तोडणी -वाहतुक यंत्रणा भरणेचे काम सुरू केले आहे. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तोडणी -वाहतुक कंत्राटदारांचे वाहन व बीड, परभणी इत्यादी भागातील मजूर पुरविणे चे करार करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन सुभाष देसाई, जेष्ठ संचालक मुकुंदादा देसाई, गोविंद पाटील, रणजीत देसाई, शिवाजी नांदवडेकर , प्र. कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांच्या हस्ते कराराचे वाटप करण्यात आले. तोडणी -वाहतुक कंत्राटदार धनाजी शिंदे, शंकर चोथे, विजय नेवगे, उदय हरेर, शैलेश गेंगे, सुनिल मिसाळ, सलीम काकतीकर, मोसिन नेसरीकर, इत्यादी तोडणी -वाहतुक कंत्राटदारांनी करार केले. यावेळी कारखान्याचे वतीने आजरा तालुक्यातील व शेजारील गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील यापूर्वी काम केलेल्या व पुढे काम करू इच्छिणाऱ्या कंत्राटदारांना प्राधान्य देण्यात येईल त्याचबरोबर आकर्षक वाहतूक दरही दिले जातील. त्यामुळे या भागातील यंत्रणेने लवकरात लवकर आपले करार पूर्ण करून घ्यावेत असे आवाहन करणेत आले. या कार्यक्रमात ऊस पुरवठा अधिकारी अजित देसाई, शेती विभागाकडील सर्व अॅग्री ओव्हरसिअर, शेती विभागातील स्टाफ यांनी सहभाग घेतला.


🛑आजरा अर्बन बँकेचा १००० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण
( आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. (मल्टी स्टेट) )

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

दि आजरा अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. (मल्टी-स्टेट) गेली ६५ वर्षे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये आपल्या ३५ शाखांद्वारे कार्यरत आहे. मार्च २०२५ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षासाठी बँकेने १००० कोटी ठेवीचे उद्दीष्ट समोर ठेवले होते, बँकेचे सर्व सभासद, ग्राहक व हितचिंतक यांच्या मदतीने आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने एकूण ठेवी या १०२५ कोटी इतक्या झाल्या आहेत. आण्णा-भाऊ आणि संस्थापक संचालक यांच्या दूरदृष्टीने लावलेले हे रोपटे आता सशक्त वटवृक्षामध्ये रूपांतरीत झाले आहे. या प्रसंगी हे यश बँकेच्या सर्व सभासद, ग्राहक आणि हितचिंतक यांना समर्पित करत आहे असे निवेदन बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख श्री. अशोक चराटी तसेच व्हा. चेअरमन श्री. संजय चव्हाण यांनी केले. बँकेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी यांनी या परिवारशी जोडलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा : गुढीपाडवा मुहूर्तावर एकाच दिवशी ३ कोटी १७ लाख ठेव संकलन.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा येथे स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा या संस्थेने गुढीपाडव्याच्या मंगल पर्वावर रू. ३ कोटी १७ लाख ७ हजार ४५० इतक्या विक्रमी ठेव संकलनाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. गुढीपाडवा हा नवसंवत्सराचा उत्सव असुन या शुभमुहूर्तावर संस्थेच्या सभासद, ठेवीदार, खातेदार यांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाच्या जोरावर संस्थेने अवघ्या एका दिवसात तब्बल रू. ३ कोटी १७ लाख ७ हजार ४५० इतके ठेव संकलन करत संस्थेच्या आर्थिक बळकटीकरणाचा व आपल्या विश्वासार्हतेचा ठसा उमटवला आहे.

सभासदांचा आणि ठेवीदारांचा वाढता विश्वास हीच संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद आहे. सभासदांच्या हिताचे दृष्टीने व संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी संस्था सातत्याने नावीन्यपूर्ण योजना राबवते. संस्थेच्या संचालक मंडळाच्या नियोजनबध्द कार्यपध्दती आणि सभासदांच्या विश्वासामुळेच हे विक्रमी ठेव संकलन करणे साध्य झाल्याचे संस्थेचे चेअरमन दयानंद भुसारी यांनी सांगितले या ठेव संकलनामुळे पतसंस्थेच्या आर्थिक स्थैर्यात आणखी भर पडली आहे तसेच समाजाला आर्थिक दृष्टया भक्कम आधार देण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी संस्था कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेकडे एकूण १६९ कोटींच्या ठेवी, रू. १५० कोटी कर्जवाटप, ऑडिट वर्ग सतत ‘अ’ असून एकूण ९ शाखा कार्यरत आहेत. सर्व ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेच्या सर्व शाखांकडे ऑनलाईन वीज बिल, फोनबिल, डीटीएच रिचार्ज, सोनेतारण कर्जाची सोय, मनिट्रान्स्फर करणेची सोय, एनईएफटी, आरटीजीएस, क्यू आर कोड, आयएमपीएस, एसएमएस इ. अनेक सुविधा सभासदांकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत आहेत. संस्थेला राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
संस्थेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक यांनी संस्थेवर दाखविलेल्या प्रचंड विश्वासाबद्दल व कर्मचारी यांनी ठेव संकलनासाठी केलेल्या विशेष परिश्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन दयानंद भुसारी, व्हा. चेअरमन सुधीर कुंभार, सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार व संचालक मंडळ यांनी सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.