Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रजनता एज्युकेशन सोसायटी संचलित मडिलगे हायस्कूल मडिलगे.- नुतन इमारत उद्घाटन सोहळा संपन्न.

जनता एज्युकेशन सोसायटी संचलित मडिलगे हायस्कूल मडिलगे.- नुतन इमारत उद्घाटन सोहळा संपन्न.

जनता एज्युकेशन सोसायटी संचलित मडिलगे हायस्कूल मडिलगे.- नुतन इमारत उद्घाटन सोहळा संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे येथील जनता एज्युकेशन सोसायटी संचलित मडिलगे हायस्कूल मडिलगे यांचे नुतन इमारत उद्घाटन वैद्यकीय शिक्षणमंत्री नाम. हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते सोहळा संपन्न झाला. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक वामन सामंत यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष जनता एज्युकेशन सोसायटीचे अशोक चराटी होते.

Oplus_131072

यावेळी बोलताना ना. श्री. मुश्रीफ म्हणाले. ज्यावेळी आण्णा – भाऊ यांनी हि संस्था स्थापन केली तो काळ अडचणीचा व खडतर होता. ग्रामीण भागातील मुलाच्या शिक्षणासाठी संस्थेने संस्था निर्माण केल्या व चालवल्या शासनाने शिक्षणाचा जाळ या आपल्या राज्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला.आणि तोच आदर्श ठेवून अण्णाभाऊंनी आपल्या विभागांमध्ये अशा प्रकारच्या संस्था चालवल्या फार मोठ्या कष्टाने आणि हिमतीने उभा केल्या आणि त्यांच्या पश्चात संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी त्यांचे सर्व सहकारी यांच्या सोबत नवीन इमारत केली केंद्र सरकारने नवीन नियमावली नुसार चांगल्या पद्धतीने संस्था चालवली आणि आज प्रेमाने मला या उद्घाटनासाठी बोलावलं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.

त्याला मी धन्यवाद देतो. शिक्षणाचा पुढील काळ आव्हानात्मक आहे. शिक्षकांनी गार्भीयाने घेऊन नवीन ज्ञान घ्यावं लागेल. खऱ्या अर्थाने माझी राजकीय वाटचालीची सुरुवात स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या सोबत झाली. यानंतर खास. सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक व राजकीय काम केले कालांतराने काही मतभेद तयार झाले व यानंतर माझा राजकीय प्रवास करत जनतेने मला सहा वेळा या कागल विधानसभा निवडणुकीत विजयी केले. जनतेसाठी काम करत असताना जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून अनेक योजना राबविल्या व यशस्वी केल्या त्याचा लाभ आजही जनता घेत आहे.‌ यापुढे उपचारांसाठी नागरिकांना मुंबईत जावे लागणार नाही. हीच जनतेची सेवा आहे. असे नाम. मुश्रीफ म्हणाले.

यावेळी संचालक के. व्हि. येसणे म्हणाले संघर्षमय वाटचालीतुन व आण्णा भाऊ यांच्या मुळे या हायस्कूलची वाटचाल प्रयत्नशील झाली. आज इमारतीसाठी जागा दिली व गावात स्वताच्या जागेत इमारत झाली. इतकी दिवस केलेल्या प्रयत्नांना यश आले असल्याचे सांगत यापुढील काळात पट संख्या वाढीसाठी गावानं प्रयत्न केले. पाहिजेत असे श्री. येसणे म्हणाले.
संचालक विलास नाईक यांनी संस्थेच्या इमारती भोवती आपल्या मनोगतात कंपाऊंड करून मिळावे अशी मागणी नाम. मुश्रीफ यांच्याकडे केली. यावेळी मुख्याध्यापक वामन सामंत म्हणाले मुश्रीफ साहेब म्हणजे जनतेचे जीवन दाते, अनेक आरोग्याची सेवा पुरवण्यासाठी योजना आणल्या, मडिलगे हायस्कूलची स्थापना १० आक्टोबर १९९१ साली झाली. ज्यांनी संस्थेच्या वाटचालीसाठी सहकार्य केले त्या सर्व ग्रामस्थांचे व दात्याचे कौतुक करत मदत केलेल्या दात्याचे आभार मानले. ३२ वर्ष भाड्याच्या घरात हायस्कूलचे वर्ग भरत होते असे ते आज स्वताच्या इमारतीमध्ये वर्ग भरतात त्याचा आनंद व अभिमान वाटतो असे मुख्याध्यापक श्री सामंत म्हणाले.

यावेळी डॉ. अनिल देशपांडे, संचालक विजयकुमार पाटील, विलास नाईक, डॉ दिपक सातोसकर, रमेश कुरुणकर, दिनेश कुरुणकर, सु. ई. डांग तसेच ग. सु. पाटील, कारखाना संचालक दिपक देसाई,
बबन पाटील, पांडूरंग पाटील, आबाजी पाटील, भाऊसो पाटील, श्रीमती. अनुसया हासबे, सरपंच बापू निऊंगरे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, डॉ. संदीप देशपांडे बी. जी पाटील, उपसरपंच पांडुरंग जाधव, हायस्कूलचे सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचलन ए.वाय. येसने मॅडम यांनी केले आभार आर. एच. मुल्ला सर यांनी केले.

Oplus_131072

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.