औरंगजेबाला इथे गाडला असा फलक लावा पुढच्या पिढीला समजले पाहिजे.- मनसे अध्यक्ष राज ठाकरे
(गुढी पाडवा निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा संपन्न.)
मुंबई.- प्रतिनिधी.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मेळावा मुंबई येथील शिवाजी पार्क येथे संपन्न झाला. महाराष्ट्रातील तमाम मनसैनिकांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले ज्या मतदारांनी मतदान केले व ज्यांनी मतदान करुन दिसलं नाही त्याचाही आभार मानले
मी कुंभमेळ्याचा अपमान केला नाही. पण आज नद्यांची भीषण अवस्था आहे. गंगा स्वच्छ कधी करणार रोज आश्वासने दिली. गंगा किती स्वच्छ आहे. यावेळी गंगेची चित्रफीत दाखवली. ३३ हजार कोटी रुपये गंगा स्वच्छ करण्यासाठी खर्च दाखवला आहे. मुंबईत पाच नद्या होत्या त्यातील चार नद्या मारुन टाकल्या..एक आहे मीठी नदी या नदीची परिस्थिती वाईट आहे. वृक्षतोड थांबली पाहिजे. चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. आज इतिहास माहित नसलेले पण विधानसभेत इतिहासावर बोलतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक विचार आहे. जाती पातीचे राजकारण फक्त कुठल्या जगात राहतो काय चाललंय आहे. औरंगजेब २७ वर्षं महाराष्ट्रात लढत होता. एकही लढाई जिंकला नाही. पण त्याला शिवाजी नावाचा विचार पुसायचा होता. औरंगजेबाला इथे गाडला असा फलक लावा पुढच्या पिढीला समजले पाहिजे.
मोबाईलवर इतिहास वाचायचा बंद करा. शासकीय योजनेवर बोलताना म्हणाले लाडकी बहीण योजना बंद होत चालली आहे.मी निवडणुकीत सांगितले होते खरे पण त्यावेळी लोकांना खोटं पटलं रोज जाती धर्मावर राजकारण
धर्मामुळे देशाची प्रगती होणार नाही. धर्म रस्त्यावर नको घरात ठेवा आम्हाला स्पिकरचा त्रास होतो. स्टिकर बंद करा. पण हा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने अंमलात आणला.
बीड मध्ये सरपंच संतोष देशमुख प्रकरण त्यानं खंडणीला विरोध केला म्हणून मारला याला वेगळं वळण लावुन जातीपातीच्या राजकारणाचे विषय पुढे येतात त्या देशमुख कुटुंबीय न्याय कधी देणार. देवेंद्र फडणवीस आम्ही तुमच्या सोबत अहोत. पण चालेल आहे. ते विचारपूर्वक करा. प्रत्येक आस्थापनेवरील सर्वांनी मराठी भाषेत बोलले पाहिजे. १९६६ साली शिवसेना स्थापना पुर्वी पुस्तक प्रकाशित झाले होते. उठ मराठ्या ऊठ..त्यातील ओळी वाचून दाखवत पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला. सर्वजण मराठा म्हणून एकत्र या. असे बोलताना म्हणाले यावेळी
मनसे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे, उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार सह मनसे पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. या दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून लाखो मनसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.