Homeकोंकण - ठाणेठाण्यासह ७ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा.🛑बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने...

ठाण्यासह ७ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा.🛑बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी.. पहा काय आहे परिपत्रक..

🟥ठाण्यासह ७ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा.
🛑बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी.. पहा काय आहे परिपत्रक..

🟥ठाण्यासह ७ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा.

मुंबई :- प्रतिनिधी.

आता टोपी किंवा स्कार्फ नाही तर चक्क छत्री घेऊन घराबाहेर पडावं लागणार आहे. याचं कारण म्हणजे विकेण्डला ७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाचे तज्ज्ञ सुप्रित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन दिवसात 2 ते तीन डिग्री सेल्सियसने तापमानात घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दोन ठिकाणी 42 ते 44 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात 40 ते 42 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कोकण पट्ट्यात दिवसा उष्ण तर संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत.
पुढचे दोन दिवस दिवसा तापमानात 2-3 डिग्री सेल्सियसने वाढ होऊ शकते. तर रात्री तापमाना २-३ डिग्री सेल्सियसने घसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर तीन दिवस कोणताही बदल होणार नाही. मात्र मे आधीच उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. अवकाळी पाऊस आणि ऊन यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. नागपूर, ब्रह्मपुरी, अकोला, वर्धा, अमरावतीमध्ये सर्वाधिक उच्च तापमानाची नोंद करण्यात आली. अनेक भागांमध्ये 42 अंशांपेक्षा जास्त तापमान होतं. दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळपासून ते महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवापालट होत आहे.

🛑बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी
( शासनविषयक बातम्यांची त्वरित दखल घेतली जाणार प्रधान सचिव ब्रिजेश सिंह)

मुंबई :- प्रतिनिधी.

नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांविषयी विविध माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने आज महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाद्वारे विविध माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या शासनविषयीच्या महत्त्वपूर्ण बातम्यांची दखल घेऊन त्याद्वारे शासनाची कार्यक्षमता वाढवून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिली.

👉प्रमुख वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे

माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या विविध बातम्यांची शासकीय विभागांकडून तात्काळ दखल घेण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी, समस्यांच्या निराकरणासाठी मदत होणार आहे. कार्यक्षम सेवा, वितरण यंत्रणा, समस्यांचे जलद निराकरण करणे याकरिता माध्यमांमधून प्रसिद्ध होणारी माहिती तथा बातम्यांची महत्त्वपूर्ण मदत घेता येणार आहे.

🛑परिपत्रकाचा प्रमुख उद्देश

🔺माध्यमांशी संवाद वाढविणे
🔺नागरिक-शासन दुवा मजबूत करणे
🔺पारदर्शक संवाद प्रक्रिया राबविणे
🔺नियमित माहितीची देवाण-घेवाण करणे.

👉कार्यपद्धती.

प्रत्येक विभागात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती
⭕बातम्यांची त्वरित दखल
⭕साप्ताहिक कृती अहवाल
⭕मासिक पुनर्विलोकन बैठका

🛑अपेक्षित परिणाम

🔺बातम्यांची त्वरित दखल घेऊन जलद तक्रार निवारण
🔺नागरिकांच्या समाधानात वाढ
🔺प्रशासकीय कार्यक्षमता वृद्धी
🔺सुशासन, प्रतिमा बळकटीकरण

🟥माध्यमांमधील माहितीची त्वरित दखल.

सदर परिपत्रक म्हणजे पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे माध्यमांमधून प्रसिद्ध होणारी माहिती आणि बातम्यांची दखल घेऊन त्याद्वारे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा कार्यान्वित होईल, असे श्री. सिंह यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.