Homeकोंकण - ठाणेमोहित कंबोज जलसंपदा विभागाची कंत्राटं वाटतो.- शिंदे गटाच्या आमदाराचा विधानसभेत आरोप! (...

मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कंत्राटं वाटतो.- शिंदे गटाच्या आमदाराचा विधानसभेत आरोप! ( सत्ताधाऱ्यांचे दलाल आणि आका महाराष्ट्र लुटताहेत.- हर्षवर्धन सपकाळ.)🟥भाजप नेत्याने पत्नी व मुलांवर केला गोळीबार.- तिघांचा मृत्यू.👇👇

🟥मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कंत्राटं वाटतो.- शिंदे गटाच्या आमदाराचा विधानसभेत आरोप! ( सत्ताधाऱ्यांचे दलाल आणि आका महाराष्ट्र लुटताहेत.- हर्षवर्धन सपकाळ.)
🟥भाजप नेत्याने पत्नी व मुलांवर केला गोळीबार.- तिघांचा मृत्यू.👇👇

🛑मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कंत्राटं वाटतो.- शिंदे गटाच्या आमदाराचा विधानसभेत आरोप!.

मुंबई – प्रतिनिधी.

मंत्री कार्यालयात दलाल आणि फिक्सरांना थारा नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या भूमिकेचे स्वागत होत असतानाच शिंदे गटाचे आमदार बाबुराव कोहळीकर यांनी भरविधानसभेत, मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कंत्राटे वाटतो, असा गंभीर आरोप करत महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करताना आमदार बाबुराव कोहळीकर यांनी जलसंपदा विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड केला. वैधानिक विकास मंडळाची स्थापना करूनही मराठवाड्याचा अनुशेष दूर झाला नसल्याकडे लक्ष वेधत बाबुराव कोहळीकर म्हणाले, वैनगंगा नदीवर 1600 कोटी रुपयांचे सात बंधारे मंजूर करण्यात आले. याच कामाचे कंत्राट राजस्थानमधील कंपन्यांना देण्यात आले. या कंपन्यांची कामे काही ठिकाणी सुरू झाली आहेत. मात्र, स्थानिक लोप्रतिनिधींना त्यांची माहिती न देता परस्पर कामाचे कंत्राट दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

एक लाख रुपयांचे एखादे काम असेल तरी त्या ठिकाणी काम कोणत्या योजनेतून होत आहे त्याचा फलक लावण्यात येतो. त्याच्या उदघाटनाला स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलावले जाते, पण एवढे मोठे काम होताना त्याची कुणालाही माहिती नाही. मोहित कंबोज नावाची व्यक्ती कामाचे वाटप करत असल्याचे मी ऐकले आहे. लोकहिताची कामे करत असताना त्याच्या भूमिपूजनाला संबंधित मंत्र्याला बोलवा, अथवा ज्यांनी काम दिले त्यांना बोलवा, असा टोला बाबुराव कोहळीकर यांनी लगावला.

सत्ताधाऱ्यांचे दलाल आणि आका महाराष्ट्र लुटताहेत.- हर्षवर्धन सपकाळ

मुख्यमंत्री नावडत्या अधिकाऱयांना दलाल-फिक्सर म्हणून मंत्री कार्यालयातून बाहेर काढता, पण शेकडो कोटींची कंत्राटे मॅनेज करून वाटणारे मोठे फिक्सर हवेहवेसे आहेत का? शिंदे गटाच्या आमदारांनी जलसंपदा विभागात अनधिकृतपणे सुरू असलेल्या कामाच्या वितरणाबाबत खळबळजनक आरोप केला आहे. या कंबोजचा मुख्य आका कोण आहे? सत्ताधाऱयांचे दलाल आणि आका मिळून महाराष्ट्र लुटत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

🟥भाजप नेत्याने पत्नी व मुलांवर केला गोळीबार.- तिघांचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भाजप नेत्याने आपली पत्नी आणि तीन मुलांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिसऱ्या मुलाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.तर भाजप नेत्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. योगेश रोहिल्ला असे या भाजप नेत्याचे नाव आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत मृत्यू झालेल्या तीनही मुलांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर दुसरीकडे पोलिस संरक्षणामध्ये भाजप नेत्याच्या पत्नीवर उपचार सुरू आहे.

अधिक माहिती अशी की, भाजप नेते योगेशच्या पत्नीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. योगेश हा भाजपच्या सहारनपूर जिल्हा कार्यकारिणीचा सदस्य आहे. योगेश रोहिल्ला मागील अनेक दिवसांपासून मानसिक दृष्ट्या आजारी होता अशी प्राथमिक माहीती समोर आली आहे. त्याने हे कृत्य का केले यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.स्वत: योगेशने घडलेला प्रकार शेजाऱ्यांना जाऊन सांगितला.आपणच आपल्या तीन मुलांवर आणि बायकोवर गोळीबार केल्याचे त्याने सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.