🛑नोंदणीकृत वाहनांना बसवण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ.- अधिकृत माहिती काय आहे पहा..
🛑 आजरा व्यंकटराव हायस्कूलच्या यशात आणखी भर.
मुंबई.- प्रतिनिधी

शासनाकडून दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि.31 मार्च 2025 पर्यंत बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापी सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसवण्यासाठी 30 जून पर्यंत नव्याने मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे. सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसविण्याकरीता M/s.Rosemerta Safety Systems Ltd या उत्पादक संस्थेची नेमणूक केलेली आहे. या उत्पादक संस्थेने कोल्हापूर जिल्ह्याकरीता एकूण 29 अधिकृत फिटमेंट सेंटर्सची नियुक्त केली आहे. वाहनधारकांनी https://transport.maharashtra.gov.in यासंकेतस्थळावर नोंदणी करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉईटमेंट घेऊन वाहनांवर HSRP बसवण्याची कार्यवाही करावी.
अधिकृत फिटमेंट सेंटर्सची (FC) कडून वाहनांवर बसवण्यात आलेले HSRP हेच केवळ वैध मानले जाईल आणि वाहन पोर्टलवर अद्ययावत केले जाईल. प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर या कार्यालयात वाहन मालकीचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, विमा अपडेट, इत्यादी वाहन संदर्भातील कामे वाहनांना HSRP बसविल्याचे प्रमाणिकरण केल्यानंतरच करण्यात येतील, याबाबतची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी.
HSRP संचासह बसविण्याचे शुल्क (Fitment Charges) GST वगळून खालीलप्रमाणे आहेत.
दुचाकी आणि ट्रॅक्टर – 450 रुपये, तीनचाकी – 500 रुपये व 1 व 2 मधील वगळून इतर सर्व वाहने – 745 रुपये याप्रमाणे राहील, जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी खालील सूचनांनुसार वाहनांना HSRP बसविण्याची कार्यवाही करावी. अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिला आहे.
🛑 आजरा व्यंकटराव हायस्कूलच्या यशात आणखी भर
आजरा.- प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित गणित प्रज्ञा परीक्षेत व्यंकटराव हायस्कूल आजरा चे घवघवीत यश मिळाले आहे. यामध्ये
इयत्ता 8 वी.
जिल्ह्यातील पहिल्या 25 मधील विद्यार्थी..
1 सौश्रुती अमित पुंडपळ जिल्ह्यात 3री
2 विवेक धनाजी पाटील जिल्ह्यात 5 वा
3 स्वराज प्रविण निंबाळकर जिल्ह्यात 12 वा
या विद्यार्थ्यांना शिल्ड प्रमाणपत्र व रोख 1000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
💥प्रज्ञा गुणवत्ताधारक विद्यार्थी.
1) रुद्र विशाल गुरव
2) सुमेध दशरथ कांबळे
3) कार्तिक रमेश दळवी
4) संस्कार संजय तेजम
5) अर्णव समीर जाधव
6) संस्कृती धनाजी इलगे
7) विभावरी विक्रम जावळे
8) सानवी लक्ष्मण चौगुले
9) धनश्री महेश देसाई
10) आर्या अशोक कांबळे
या विद्यार्थ्यांना प्रज्ञा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना सौ ए डी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा चे अध्यक्ष जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ तसेच प्रशालेचे प्राचार्य कुंभार आर.जी.पर्यवेक्षिका सौ.शेलार व्ही.जे यांचे प्रोत्साहन लाभले.
🛑जिल्हास्तरीय श्री रामानुजन गणित प्रज्ञाशोध परीक्षेत व्यंकटराव हायस्कूलचे सुयश.

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ गणित विषय समिती यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय श्री रामानुजन गणित प्रज्ञाशोध परीक्षेत आमच्या व्यंकटराव हायस्कूचा विद्यार्थी कु.अद्वैत महादेव पाटील इ. ५ वी प्रज्ञा प्रमाणपत्र धारक झाला. मार्गदर्शक शिक्षक, ए वाय चौगुले. अध्यक्ष जयवंतराव शिंपी व सर्व संचालक , आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा.
प्राचार्य आर जी कुंभार पर्यवेक्षिका सौ. शेलार व्ही.जे
सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक. यांचे प्रोत्साहन लाभले.
