🛑मलिग्रेत जागतिक महिला दिनानिमित्त केला विधवा महिलेचा सन्मान व सत्कार सोहळा संपन्न.
🛑आरदाळ येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.
( महिला लेझीम पथकासह विविध वेशभूषा ठरल्या लक्षवेधी.)
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा मलिग्रे येथे संविधानाच्या सन्मानार्थ ८ मार्च जागतिक महिला दिन – जनजागृती मोहीम कार्यक्रम, पोस्टर्स प्रदर्शन व महिलांच्यासाठीच्या वेगवेगळ्या स्पर्धा अशारितीने महिला दिन उत्साहात संपन्न झाला. संविधान सन्मानासाठी महिलांच्या सन्मानासाठी, महिलांच्या न्याय हक्कासाठी या विषयावर यामध्ये संजय घाटगे, संग्राम सावंत, सरपंच शारदा गुरव व मंगलताई कांबळे या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
त्याचबरोबर शाळेतील सुकन्या बुगडे, दूर्वा कागिनकर व दुर्वा बुगडे या मुलींनी भाषणे केली. यावेळी शाळेच्या आवारामध्ये आम्ही भारतीय लोक अभियान व मासूम संविधान फेलोशिप कार्यक्रम अंतर्गत पोस्टर प्रदर्शन लावण्यात आले होते.यामध्ये संविधानाच्या वेगवेगळ्या मूल्यांची माहिती देणारे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाची माहिती देणारे पोस्टर प्रदर्शन शाळेच्या आवारात लावण्यात आले होते.
त्याचबरोबर महिला दिनानिमित्त महिलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये अंगणवाडी सेविकांनी खूप मेहनत घेतली होती.
यावेळी विशेष सत्कार हा महिला जागतिक दिनानिमित्त विधवा महिलेचा सन्मान करणारा केला. यामध्ये शितल बुगडे यांनी त्यांचे पती वारल्यानंतर कुंकू दागिने व सुहासिनीचा मान न सोडता कायम त्यांनी ठेवला. तसा ठराव गावामध्ये करण्यात आला. हा एक क्रांतिकारी बद्दल झाल्याबद्दल त्यांचा विषय सत्कार सर्वांच्या वतीने घेण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त मलिग्रे गावात महात्मा ज्योतिबा फुले विद्यामंदिरात सरपंच शारदा गुरव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपसरपंच चाळू केंगारे, संविधान संवर्धन चळवळीचे कार्यकर्ते संग्राम सावंत, सदस्या शोभा जाधव, सुरेखा तर्डेकर, कल्पना बुगडे, महिला राज्यसत्ता आंदोलनाच्या नेत्या मंगलताई कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संजय घाटगे, बाळू कांबळे, शिवाजी भगुत्रे, संजय कांबळे,सचिन लोहार, महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनच्या राज्य सदस्या लक्ष्मी कांबळे, माजी सरपंच अशोक शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सविता कागिनकर, उपाध्यक्षा पुजा पन्हाळकर, अंगणवाडी सेविका शशिकला घोरपडे, अपूर्वा देशपांडे, नंदा पवार व लोहार मॅडम, मदतनीस नंदा बुगडे, शितल बुगडे व शोभा बुगडे यांच्यासह सविधान गटातील महिला व ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.
संविधान संवर्धन चळवळ, महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ,आम्ही भारतीय लोक अभियान, राष्ट्रमाता जिजाऊ संविधान गट, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान गट, मुक्ती संघर्ष समिती,महात्मा जोतिबा फुले विद्यामंदिर व अंगणवाडी आणि ग्रामस्थ,मलिग्रे यांच्या वतीने संविधानाच्या सन्मानार्थ जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीच्या ओवीने मंगल कांबळे यांनी केली. कार्यक्रमाचा शेवट शकुंतला बोरनाक यांनी तुकोबारायांच्या अभंग गाऊन केला.
कार्यक्रमाचे स्वागत संविधानाची प्रास्ताविका व संविधानाचे पुस्तक देऊन मान्यवरांचे करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनीषा सुतार यांनी तर आभार कल्पना कोरवी यांनी मानले.

🛑आरदाळ येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.
( महिला लेझीम पथकासह विविध वेशभूषा ठरल्या लक्षवेधी.)
आजरा.- प्रतिनिधी.

महिलांचे लेझीम पथक, पारंपारिक वेशभूषा व विविध उपक्रमांनी ८ मार्च जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला. महिला दिनानिमित्त आरदाळ येथील क्रांतीज्योती महिला संविधान गट व ग्रामपंचायत आर्दाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजता गावातील महिलांच्या लेझीम पथकाचे उद्घाटन माजी सरपंच विजय वांगणेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. त्यानंतर गावातून पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेमध्ये आरदाळ गावच्या सरपंच रूपाली पाटील, पदाधिकारी, मान्यवर यांच्यासह विविध पारंपारिक वेशभूषेमध्ये गावातील नागरिक, स्त्री-पुरुष, प्राथमिक विद्यामंदिर आरदाळ शाळेतील विद्यार्थी, माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला. या पदयात्रेमध्ये आरदाळ गावच्या सरपंच रुपाली पाटील यांचे पती सूर्यकांत पाटील या पती – पत्नींनी ‘सावित्रीबाई फुले व महात्मा फुले’ यांची वेशभूषा केली होती. तर ग्रामपंचायत सदस्या संगीता सुतार यांनी पती सागर सुतार यांचे सोबत ‘विठ्ठल रुक्मिणी’ रूपातील वेशभूषा केली होती. त्याचबरोबर प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील विविध क्षेत्रातील महिलांची कामगिरी अधोरेखित करणाऱ्या डॉक्टर, वकील, प्राध्यापक अशा वेशभूषा केल्या होत्या. त्याचबरोबर लोकपरंपरा दाखवणाऱ्या वासुदेव , वारकरी, टाळकरी, शेतकरी यांच्या वेशभूषित विद्यार्थी व गावातील गजानन पोवार महाराज यांचे भजनी मंडळाने सहभाग घेतला होता.
हलगी व पारंपरिक वाद्यांच्या तालावर महिलांचे लेझीम पथक,
नऊवारी साड्या, फेटे बांधून गावातील महिलांनी सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज ,राजमाता जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर ,इंदिरा गांधी अशा विविध वेशभूषा करून शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक ,सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला बचत गट, आरोग्य विभाग यांचा सहभाग होता. सुरुवातीला भैरीदेव मंदिर पासून सुरू झालेली पदयात्रा, गावातून फिरून भैरी मंदिरासमोर आल्यानंतर सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच रूपालीताई पाटील यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक भाषणात पोलीस पाटील व गटाच्या प्रमुख मनीषा गुरव यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करून गावात सर्वसमावेशक कार्यक्रम घेऊन महिलांचा मान व समानता कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सूर्यकांत पाटील, शिवाजी गुरव, शिवाजी जाधव, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक सर्व शिक्षिका यांचे मनोगत व मार्गदर्शन झाले. यावेळी लेझीम पथकाचे मार्गदर्शक कृष्णा शिवणे, हलगी वादक अण्णासो जाधव, शिवाजी पोवार, चंद्रकांत गुरव, जालिंदर डवरी यांचा सत्कार करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन ‘क्रांतीज्योती संविधान महिला गट’ यांनी केल्याने व संविधानातील मूल्यांना धरून कार्यक्रम केला याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या वेळी हर्षदा चव्हाण या विद्यार्थिनीने ‘लाटी-काठी’ खेळत कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच शाळेच्या मुला मुलींनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य व उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्या सर्वांचे आभार मानताना उपकेंद्राच्या डॉक्टर रीना यांनी आरोग्य बाबत मार्गदर्शन करून शेवटी आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
