Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रव्यंकटराव हायस्कूलमध्ये "जागतिक महिला " दिन साजरा.🛑सोहाळेत जागतिक महिला दिवस साजरा.🛑जागतिक महिला...

व्यंकटराव हायस्कूलमध्ये “जागतिक महिला ” दिन साजरा.🛑सोहाळेत जागतिक महिला दिवस साजरा.🛑जागतिक महिला दिनानिमित्त पारपोलीत विविध स्पर्धेचे आयोजन.🛑पोलिस बांधवांसाठी नेत्रनिदान शिबिर.( रोटरी क्लब आणि गडहिंग्लज पत्रकार संघाचा उपक्रम )

🛑व्यंकटराव हायस्कूलमध्ये “जागतिक महिला ” दिन साजरा.
🛑सोहाळेत जागतिक महिला दिवस साजरा.
🛑जागतिक महिला दिनानिमित्त पारपोलीत विविध स्पर्धेचे आयोजन.
🛑पोलिस बांधवांसाठी नेत्रनिदान शिबिर.
( रोटरी क्लब आणि गडहिंग्लज पत्रकार संघाचा उपक्रम )

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल आजरामध्ये जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा झाला . या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळ आजराच्या संचालिका सौ अलकाताई शिंपी व प्रमुख पाहुण्या डॉ. मंगल मोरबाळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक श्री सचिन शिंपी,प्राचार्य श्री आर.जी. कुंभार, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे शेलार, प्राथमिक विद्या मंदिर मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, या कार्यक्रमाच्या आयोजिका इयत्ता आठवी “क “वर्ग व वर्गशिक्षिका सौ.आशा सचिन गुरव व सर्व व्यंकटराव परिवार उपस्थित होता.
प्रास्ताविक सौ एस पी कुंभार मॅडम यांनी केले. त्यांनी सांगितले की आजची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात कर्तबगार आहे. स्त्रीने आपली झेप सर्व क्षेत्रात घेतली आहे. ही स्त्री अबला नाही तर आजची स्त्री ही धडधडता अंगार आहे.
व्यासपीठावरील सर्व सन्माननीयांचे स्वागत व महिला दिनानिमित्त सर्व शिक्षिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्राध्यापक श्री शिवाजी पारळे यांनी महिला दिनांला शुभेच्छा देताना शांता शेळके यांची कविता सादर केली.
प्रमुख वक्त्या डॉ.मंगल मोरबाळे यांनी आपल्या व्याख्यानामधून “आजची स्त्री ही सुरक्षित आहे का? आजच्या स्त्रीने आहाराच्या बाबतीत दक्ष राहिले पाहिजे ..सकस संतुलित आहार घेतला पाहिजे.. तरच आपलं शरीर उत्तम राहू शकते .आरोग्यम् धनसंपदा यासाठी दररोज तिने व्यायाम केला पाहिजे ,योगासन केली पाहिजेत, आरोग्याच्या बाबतीत सर्व स्त्रियांनी सजग राहिले पाहिजे सोशल मीडियाचा वापर करताना स्त्रियांनी विशेष काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे विद्यार्थिनींनी शाळेला येताना व जाताना अनोळखी व्यक्ती वर पटकन विश्वास ठेवू नये. तसेच मोबाईलचा शक्यतो वापरच करू नये. असे सांगितले.
संचालक श्री सचिन शिंपी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना समानता दिल्याची थीम यावर आपले विचार मांडले. व सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संचालिका सौ अलकाताई शिंपी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, स्त्री ही पूर्वापार शोषित, कष्ट सहन करणारी, कर्तबगार आणि संपूर्ण पिढी घडवणारी आहे. राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यासारख्या असंख्य महिलांचे तत्कालीन कार्य आज समाजासमोर आदर्श आहेत. त्याचबरोबर आजच्या स्त्रीमध्ये पण कणखरपणा, स्वाभिमान देशाभिमान, कुटुंबाबद्दल प्रेम अपार आहे त्यामुळेच कोरोना सारख्या काळातही अनेक महिलांनी आपला विस्कटलेला संसार आणि आर्थिक परिस्थिती सावरताना विविध लघुउद्योगधंदे , अपार कष्ट करून पुन्हा उभे केले. कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी आज समर्थपणे पेलली आहे. अशा महिलांचाही या दिवशी सन्मान होणं गरजेचं आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एम.सी. हरेर यांनी केले. सौ.व्ही.ए.वडवळेकर यांनी “कर्तव्य” या स्वरचित कवितेतून आपले विचार मांडले.
सौ. अस्मिता पाटील यांनी आभार व्यक्त केले.

🛑सोहाळेत जागतिक महिला दिवस साजरा.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

सोहाळे ता. आजरा येथील नालंदा नगर मध्ये जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला यावेळी आमच्या सोहाळे गावच्या आदर्श महिला व गावच्या सरपंच मा.भारती कृष्णा डेळेकर मॅडम यांचा येथोचं सत्कार आमच्या नालंदा नगर मधील जेस्ट महिला श्रीमती तानुबाई भीमराव कांबळे यांच्या शुभ हस्ते पार पडला.यावेळी सर्व उपासक व उपाशिका उपस्तीत होते…या वेळी जागतिक महिला दिवस निमित्त उपासकांनी केक आणून महिलांचे स्वागत व आभार मानले‌ सूत्रसंचालन दर्शना कांबळे यांनी केले तर आभार वनिता कांबळे यांनी मांनले

🛑जागतिक महिला दिनानिमित्त पारपोलीत विविध स्पर्धेचे आयोजन.

आजरा.- प्रतिनिधी.

ग्रामपंचायत पारपोली, कोर समिती आजरा, श्री. महालक्ष्मी बचत गट पारपोली यांच्या विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहत साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच प्रियांका प्रकाश शेटगे यांच्या हस्ते तसेच दीपप्रज्वलन उपसरपंच प्रकाश यशवंत कविटकर व कोर समितीच्या केसरकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक सुनीता शेटगे यांनी केले. यावेळी स्वाती पाटील मॅडम (कोर समिती संचालिका -पोळगाव ) अमरजीत नारायण ढोकरे. (अध्यक्ष – कृषी समिती )
ये. जे. जाधव सर
( मुख्याध्यापक प्रा. वि .मं. पारपोली ) डी. एस. बी. डेळेकर सर (सहाय्यक शिक्षक व्यंकटराव प्रा. वि. मं. आजरा ) यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे वैशिट्य
विधवा महिलांचे स्वागत
विविध स्पर्धेचे आयोजन.
त्यामध्ये खुल्या संगीत खुर्ची स्पर्धत सुनीता शेटगे, गीता ढोकरे, लक्ष्मी ढोकरे
बादलित बॉल टाकणे.
निता गुंजाळ, गीता ढोकरे, रुक्मिणी पवार. लिंबू -चमचा – अंकिता गुरव, आकांशा शेटगे, सानिका शेटगे. संगीत खुर्ची व बादलित बॉल टाकणे साठी आकर्षक बक्षीस देण्यात आली.
लिंबू चमचा साठी वही व पेन, तसेच विशेष म्हणजे श्री महालक्ष्मी वाचनालयाकडून प्रमाणपत्र बक्षीस म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, कोर समिती संचालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, c.r. p. मॅडम, आशा सेविका, सानिका शेटगे, जानवी सावंत, मयुरी जाधव,ज्ञानेश्वर गुंजाळ, अशोक मालव,संदीप मिटके, अर्जुन शेटगे, चंद्रकांत शेटगे, त्याचबरोबर पारपोली व गावठाण मधील सर्व महिला, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
विद्या चंद्रकांत शेटगे यांनी तर
संध्या संदीप मिटके यांनी आभार म्हणाले.

Oplus_131072

🛑पोलिस बांधवांसाठी नेत्रनिदान शिबिर.
( रोटरी क्लब आणि गडहिंग्लज पत्रकार संघाचा उपक्रम )

गडहिंग्लज :- प्रतिनिधी.

Oplus_131072

रोटरी क्लब गडहिंग्लज, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ आणि डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले. पोलिस, होमगार्ड आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी हे विशेष शिबिर झाले.
गडहिंग्लज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष दीपक मांगले यांनी उपस्थितांचे स्वागत करत शिबिराचा हेतू स्पष्ट केला.
दीपक मांगले म्हणाले, रोटरी क्लब ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वाधिक सामाजिक कार्य करणारी संघटना आहे. स्वखर्चाने जनतेच्या सेवेसाठी ते अखंड कार्यरत असतात. पोलिस खाते हे सतत तणावाखाली असणारे खाते आहे. मुख्यतः त्यांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेणार आहोत.
सिंदकर म्हणाले, पोलिसही प्रथम माणूस आहे ही भावना दाखवणाऱ्या रोटरी क्लब आणि पत्रकार संघाचे मनापासून आभार मानतो. असेच सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती सद्भावना निर्माण करता हे खूपच उल्लेखनीय कार्य आहे.
यावेळी उपस्थित पोलिस, पत्रकार आणि रुग्णालयातील महिला शक्तीचाही सन्मान करण्यात आला. दिवसभरात एकूण ६५ पोलिस बांधवांची तपासणी पूर्ण झाली. पोलिस उपअधिक्षक रामदास इंगवले यांनी उपक्रमात सहभागी होत शिबिराला शुभेच्छा दिल्या.
रोटरी क्लबचे सचिव धनाजी कल्याणकर, सचिन घुगरे, सचिन शेंडगे, सुधाकर गवळी, श्रीकांत कळसकर, भूषण सावळे, पत्रकार नितीन मोरे, सुरेश खोत, विजयकुमार कांबळे, संभाजी जाधव, अमित कांबळे, धनंजय शेटके, निकिता पोवार, अमित गुरव यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. किशोर घेवडे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.