Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रनगरविकास विभाग अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानआजऱ्यात पथनाट्यद्वारे जनजागृती.- नागरिकांचा प्रतिसाद.🛑घर आगीत जळून...

नगरविकास विभाग अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानआजऱ्यात पथनाट्यद्वारे जनजागृती.- नागरिकांचा प्रतिसाद.🛑घर आगीत जळून खाक वुमन ग्रुपने दिला मदतीचा हात – आजरा गांधीनगर.

🛑नगरविकास विभाग अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान
आजऱ्यात पथनाट्यद्वारे जनजागृती.- नागरिकांचा प्रतिसाद.
🛑घर आगीत जळून खाक वुमन ग्रुपने दिला मदतीचा हात – आजरा गांधीनगर.

आजरा :- प्रतिनिधी.

आजरा येथील नगरपंचायत नगरविकास विभाग आजरा आयोजित स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत कचरामुक्त शहरे, कचऱ्याचे वर्गीकरण, कचऱ्यावर शास्रोक्तपद्धतीने प्रक्रिया त्याचप्रमाणे प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जन जागृतीसाठी रस्त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यावर कौटील्य मल्टीक्रियेशन प्रा. ली. मुंबई पथनाट्याद्वारे स्वछता अभियान रबवण्यात आले. त्यानुसार आजऱ्यामध्ये स्वच्छतेचे नियम व निरोगी जीवनाविषयीं पथनाट्याद्वारे व स्क्रीन व्हॅनद्वारे लोकजागृती करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये कचरामुक्त शहरे करण्यासाठी शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची नियमित शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

कचऱ्याचे ओला कचरा, सुका कचरा तसेच घातक कचरा असे वर्गीकरण करून कचऱ्याचे सेंद्रिय, पुनर्वापर, योग्य व धोकादायक असे वर्गीकरण केल्याने नैसर्गिक साधनांचे संवर्धन होऊन कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने होते. धोकादायक कचऱ्याचे योग्य वर्गीकरण केल्यामुळे कचरा हाताळणाऱ्यांना आणि जनतेला हानिकारक पदार्थांच्या संपर्कापासून संरक्षण मिळते. कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट सुनिश्चित होते आणि पर्यावरण दूषित होण्याचा धोका कमी होतो. धोकादायक रसायने, माती पाण्यात मिसळून नैसर्गिक स्त्रोत्र दूषित करू शकतात. कचऱ्याच्या प्रक्रिया किंवा विल्हेवाट दरम्यान हे धोकादायक पदार्थ आगीचे, स्फ़ोटांचे किंवा विषारी उत्सर्जनाचे कारण बनू शकतात. कामगार आणि आसपासच्या समुदयांना धोक्यात आणू शकतात. यासाठी धोकादायक वस्तूंना नियमित कचऱ्यापासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचे मनोरंजनातून लोकजागृती करण्याचे काम कौटील्य मल्टीक्रियेशन प्रायव्हेट लिमिटेड मुंबईच्या कलाकाराद्वारे करण्यात आले. याचा आनंद मनोरंजनातून घेतला. पुष्पा च्या झुकेगा नै साला यातूनही मनोरंजन करीत स्वच्छतेविषयी जनजागृती पथनाट्याच्या कलाकारांनी उत्तम रित्या केली.यावेळी बघ्यांची गर्दीही झाली होती.

Oplus_131072

घर आगीत जळून खाक – वुमन ग्रुपने दिला मदतीचा हात- आजरा गांधीनगर.

आजरा.- प्रतिनिधी.

गांधीनगर आजरा येथील, आरती ससाने यांचे घर मागील शुक्रवारी आगीत जळून खाक झाले. यासाठी आजरा येथील हॅप्पी वुमन ग्रुपने मदतीचा हात पुढे केला. तांदूळ गहू तेल बिस्कीट पुडे, साड्या व कपडे व भांडी अशा जीवण उपयोगी वस्तू दिल्या. सामाजिक कार्यकर्त्या गीता पोतदार, भैरवी सावंत, धनश्री देसाई, वंदना आजगेकर, माधुरी पाचवडेकर यांनी मदत केली. यावेळी आजरा महाविद्यालयातील महिला प्राध्यापक त्यांनी ब्लॅंकेट, चटई. भांडी, व धान्य या वस्तूंची मदत केली. तर नेहा पेडणेकर, रागिणी राजमाने, लता शेटे, सुवर्णा धामणेकर, वैशाली देसाई, शोभा केंद्रे, पुनम पाटील, आरती गायकवाढ यांनी मदत केली.‌ यावेळी ग्रुपच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.