🛑“डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान वतीने गडहिंग्लज येथे “
” महा स्वच्छ्ता अभियान “
🛑 वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात सुरक्षा सप्ताहाचे आयोजन.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्यावतीने आदरणीय पदमश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज येथे महा स्वच्छ्ता मोहिमेचे आयोजन करण्यात आले .
यामध्ये संपूर्ण गडहिंग्लज शहर परिसर , सर्व शासकीय कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय (१०० बेड) ०३ स्मशानभूमी, इत्यादि ठिकाणी यशस्वीरीत्या संपन्न झाले . या महा स्वच्छ्ता अभियानासाठी सुमारे ७५० श्रीसदस्य गडहिंग्लज, आजरा, चंदगड, नेसरी, मजरे कारवे, यशवंतनगर, मुरगूड इत्यादि ठिकाणाहून आले होते.
हे स्वच्छ्ता अभियान सकाळी 8 ते १२ वाजेपर्यंत घेण्यात आले. एकूण ३१ टन कचरा गोळा करून कचरा संकलन केंद्रामध्ये मध्ये त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. या स्वच्छ्ता अभियानासाठी गडहिंग्लज तालुका तहसिलदार हृषिकेत शेळके , गडहिंग्लज पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक – मा.अजयसिंह सिंदकर , तसेच नगरपलिका आरोग्याधिकारी प्रशांत शिवणे, पंचायत समिती सहायक गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे तसेच उपजिल्हा रुग्णालय आरोग्याधिकारी चंद्रकांत खोत, गडहिंग्लज आगर प्रमुख गुरुनाथ रणे तसेच गडहिंग्लज तालुका मनसे प्रमुख नागेश चौगुले तसेच इतर मान्यवर सहभागी झाले होते.
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी, – एक महान समाजसुधारक- यांना त्यांच्या पूर्वजांकडून सामाजिक
प्रबोधनाचा वारसा लाभला. मानवी अस्तित्वाच्या प्रत्येक स्तरावर समाजातून अज्ञान नष्ट करण्याच्या कार्यासाठी त्यांनी
स्वतःला झोकून दिले. ८ ऑक्टोबर १९४३, विजयादशमी, रोजी त्यांनी सामाजिक प्रबोधनाचा पाया रचण्यास सुरुवात केली.
पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी. डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ २०१० मध्ये डॉ.
श्रीनानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्थापन केले. प्रतिष्ठान डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या भावना सह कार्य करते. त्यांनी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपन, भूजल पुनर्भरण, रक्तदान, आरोग्य जागृती शिबिरे, निर्माल्य संकलन आणि कंपोस्टिंग, प्रौढ साक्षरता, पुरानंतरच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवा केले जात आहे. एकूण ४६ शेत्रात प्रतिष्ठानचा वतीने कार्यभाग आयोजित करण्यात येत आहे. संपूर्ण देशभरात त्याचप्रमाणे अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादि ठिकाणी परदेशातसुद्धा कार्यभाग होत आहे. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘द लिव्हिंग लिजेंड’ तर डॉ. सचिन धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट, पॅरिसतर्फे ‘द ग्लोबल लीडर’ही पदवी प्रदान करण्यात आली.
🛑 वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात सुरक्षा सप्ताहाचे आयोजन.
आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात सुरक्षा सप्ताहाचे आयोजन ४ मार्च ते १० मार्च राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह निमित्त वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना येथे विविध कार्यक्रमानी सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. पहिल्या सत्रात कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते सुरक्षितता ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची शपथ देण्यात आली. दुसऱ्या सत्रात कोल्हापूर येथील ट्रेनर शिरीष पाटील यांचे कडून सर्व कर्मचाऱ्यांना औद्योगिक सुरक्षितता याविषयी ट्रेनिंग देण्यात आले. यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक मुकुंददादा देसाई, प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती, जनरल मॅनेजर एस के सावंत, चीप इंजिनियर सुरेश शिंगटे, कार्यालयीन अधीक्षक अनिल देसाई, सॅनिटरी निरीक्षक आर एन देसाई, लेबर ऑफिसर सुभाष भादवणकर ,कोल्हापूर येथील कामगार कल्याण अधिकारी ( महाराष्ट्र शासन ) विजय शिंगाडे, केंद्र संचालक संघशन जगतकर यांची प्रमुख उपस्थिती होती .या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेफ्टी ऑफिसर रमेश देसाई यांनी केले.