Homeकोंकण - ठाणेपाच वर्षांत २७६ खून.- ७६६ जणांच्या हत्येचा प्रयत्न.- मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती.🛑प्रतिज्ञापत्रासाठी ५००...

पाच वर्षांत २७६ खून.- ७६६ जणांच्या हत्येचा प्रयत्न.- मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती.🛑प्रतिज्ञापत्रासाठी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ.- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा.

🟥पाच वर्षांत २७६ खून.- ७६६ जणांच्या हत्येचा प्रयत्न.- मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती.
🛑प्रतिज्ञापत्रासाठी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ.- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा.

मुंबई :- प्रतिनिधी.

राज्यातील गुन्हेगारी कारवायांचे केंद्र म्हणून बदनाम होत असलेल्या बीड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत तब्बल २७६ जणांचे खून करण्यात आले.तर ७६६ जणांच्या हत्येचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्या आहेत.विशेष म्हणजे गेल्या १० महिन्यांत या जिल्ह्यात ३६ खुनाच्या घटना उघडकीस आल्याची धक्कादायक माहिती विधिमंडळात देण्यात आली.
आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले आदींनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवायांबाबत विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

बीड जिल्ह्यात देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह आठ आरोपींना अटक करण्यात आली असून,कृष्णा आंधळे हा फरार आहे.त्याचप्रमाणे विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असूनही, ज्या २६० जणांना शस्त्र परवाने देण्यात आले होते, त्यातील १९९ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

देशमुख यांच्याप्रमाणेच बालाजी घरबुडे आणि महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणाचा तपासही सुरू असल्याचे फडणवीस यांनी लेखी उत्तरात नमूद केले.

🛑प्रतिज्ञापत्रासाठी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा
( राज्यातील लाखो विद्यार्थी,नागरिकांना मोठा दिलासा.)

मुंबई :- प्रतिनिधी.

राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच नागरिकांना मोठा दिलासा दिला. आता शासकीय कामासाठी, प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याचा ताप कमी झाला आहे. अनेक प्रमाणपत्रासाठी नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. यापूर्वी राज्य सरकारने 500 रुपयांचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य केले होते. त्याशिवाय प्रमाणपत्र दिले जात नव्हते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उत्पन्नाचा दाखल, जात पडताळणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्रासह इतर अनेक प्रमाणपत्रासाठी 500 रुपये प्रत्येकी लागत होते. म्हणजे केवळ मुद्रांक शुल्कापोटीच विद्यार्थ्यांना वर्षाला 2 हजारांहून अधिकचा खर्च येत होता. पण आता हा खर्च वाचणार आहे. 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली.
शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ करण्यात आले आहे. आता हा खर्च वाचणार आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे बावनकुळे यांनी आदेश दिला आहे. यापुढे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार नाही. त्यांना मुंद्राक शुल्काशिवाय प्रमाणपत्र देण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.