Homeकोंकण - ठाणेपोलीस विभागात डिसेंबरपूर्वी ५ हजार २०० पदांची भरती…….

पोलीस विभागात डिसेंबरपूर्वी ५ हजार २०० पदांची भरती…….

पोलीस विभागात डिसेंबरपूर्वी ५ हजार २०० पदांची भरती…….

औरंगाबाद: प्रतिनिधी.

पोलीस विभागातील रखडलेली भरती येत्या डिसेंबरपूर्वी करण्यात येणार आहे.
पोलिसांची ५ हजार २०० पदे भरण्यात येणार असून त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.
पुढील टप्प्यात ७ हजार पदे भरण्यात येतील.
त्याचीही प्रक्रिया लवकरच सुरू होईल,
अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे दिली.
पोलिसांमधील हवालदारपदावरील कर्मचाऱ्यांचे वेतन हे उपनिरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांएवढे आहे.
किंबहुना अनेक हवालदारांचे वेतन उपनिरीक्षकांपेक्षाही अधिक आहे.
त्यामुळे त्यांना निवृत्तीपर्यंत सहायक पोलीस निरीक्षक पदावरून उपनिरीक्षकपदापर्यंत बढती देण्याचा विचार गृहविभागाने केला आहे.
सायबर गुन्ह्यंच्या तपासाच्या संदर्भाने फारसे सकारात्मक चित्र नसल्यामुळे येत्या तीन महिन्यात कामगिरी सुधारण्याचे आदेश देण्यात आल्याचेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.
करोनामुळे मृत्यू झालेल्या बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची रक्कम अदा करण्यात आलेली असून अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचेही सुस्पष्ट शासकीय धोरण असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
ई.डी.च्या कारवायांमध्ये वाढ अलीकडच्या काळात राज्यात ई.डी.च्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांचा विनाकारण वापर होऊ नये, असे आपल्याला वाटते,
असेही गृहमंत्री पाटील म्हणाले.
बदल्यांबाबत वस्तुस्थितीची माहिती घेऊन निर्णय सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईत अनेक वर्षांंपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर बदली करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.