पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात कागल तालुका कॉंग्रेसची सायकल रॅली.
कागल प्रतिनिधी.
पेट्रोल, डिझेल,घरगुती गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात कागल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निर्दशने व सायकल रॅली काढण्यात आली.
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि अत्यावशक वस्तूच्या महागाईमुळे सामान्य जनता भरडून निघत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या आदेशाने व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या विविध खात्यांचे राज्य मंत्री मा. ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या सुचनेनुसार केंद्रातील भाजप सरकारने वाढवलेल्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात कागल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वंदूर ता.कागल ते पिंपळगाव खुर्द येथील पेट्रोल पंपापर्यंत पाच कि.मी. अंतराची सायकल रॅली काढली.पिंपळगाव पेट्रोल पंपावर रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी कागल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव कांबळे यांनी आपल्या भाषणामध्ये मोदी सरकारचा तीव्र निषेध केला.यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सायकलने कागल तालुका तहसिलदार कार्यालयात जाऊन तहसिलदार शोभा ठोकडे मॅडम यांना निवेदन देण्यात आले.राजाराम मोरे सर, विठ्ठल कांबळे, नितीन पवार, केरबा कांबळे, एम.आर.कांबळे, अनिल खरटमल, मनोहर हेगडे,सात्ताप्पा हेगडे आदी यावेळी उपस्थित होते.