33 लाखांच्या गोवा बनावटीच्या दारुसह 42 लाख 94 हजारांचा मुद्देमाल जप्त.- एक्साईज च्या पथकाची इन्सुलित कारवाई
बांदा :-प्रतिनिधी.
बेकायदा गोवा बनावटीची दारूची मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या ट्रकवर इन्सुली येथे आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूच्या 24 हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या.
या कारवाईत एमपी 09 जीएफ 6647 हा नऊ लाख रुपये किमतीचा ट्रक व 33 लाख 60 हजार किमतीची दारू व इतर असा एकूण 42 लाख 94 हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने मंगळवारी दूपारी करण्यात आली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले.