सोहाळे – बाची – आजरा एस. टी तात्काळ चालू करा.- अन्यथा आंदोलन. – ग्रामपंचायत, ग्रामस्थ शालेय विद्यार्थी यांची मागणी.
आजरा.- प्रतिनिधी.
मौजे सोहाळे बाची आजरा, या मार्गावर स्वतंत्र एस टी सुरु करणे बाबत. ग्रामपंचायत सोहाळे बाची वतीने दि. १२ रोजी निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मौजे सोहाळे बाची ता. आजरा या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत मौ. सोहाळे बाची. सोहाळेवाडी या गावाचा समावेश असून या गावातील शाळेय विद्यार्थी (संख्या ७०) बहुतांशी आजरा येथे शिक्षणासाठी ये-जा करत असतात तसेच गावातील ग्रामस्थ, वयोवृद्ध यांना शासकीय कामासाठी, वैद्यकीय उपचारासाठी आजरा येथे ये-जा करावी लागत आहे. सध्यास्थितीत आजरा आगारातून एस.टी.ची संख्या कमी असल्याचे कारण देऊन सोहाळे आजरा हि बस सेवा नियमित नाही आहे. त्यामुळे शाळेय विध्यार्थी ग्रामस्थ, वयोवृद्ध यांना एस.टी. आभावी २.०० ते २.५० कि.मी पायपीट करत सोहाळे तीटृटा तेथे एस.टी. साठी जावे लागत आहे. यामुळे तीनही गावातील शाळेय विध्यार्थी ग्रामस्थ, वयोवृद्ध हे सोहाळे बाची आजरा हि स्वतंत्र बस सेवा सुरु करणेची वारंवार मागणी करत आहे या कमी उपरोक्त संदर्भान्वये आपणांकडे लेखी तोंडी निवेदन देऊन समक्ष भेटून आध्यापहि एस टी चालू झाली नाही, आपल्याकडून कोणतेही कार्यवाही झाली नाही त्यामुळे गावातील शाळेय विध्यार्थी ग्रामस्थ, वयोवृद्ध हे एस.टी. प्रशासन विरुद्ध नाराजी व्यक्त करत आहेत.
तरी वरील सर्व बाबीचा विचार करून सर्वाची होणारी गैरसोय टाळणेच्या दृष्टीने कॉलेज व शाळा भरण्याची व सुटण्याची या वेळेत सोहाळे- बाची- आजरा हि स्वतंत्र बस सेवा तात्काळ व कायमस्वरूपी सुरु करणेत विंनती आहे. जर सदर मागणीनुसार एस. टी नाही चालू केल्यास सर्व ग्रामस्थांच्या वतीने मोर्चा रस्ता रोको आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सरपंच सौ. भारती डेळेकर, उपसरपंच वसंत कोंडुसकर, आनंदा कांबळे, सुधीर कांबळे, तानाजी कांबळे, रोहन कांबळे, पांडुरंग दोरुगडे, गणपती दोरुगडे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

