संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धत – खानापूर ग्रामपंचायतचा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक.
आजरा.- प्रतिनिधी.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२३/२४ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन. २०२३/२४ अंतर्गत खानापूर ग्रामपंचायतने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये सौ.माधुरी परिट, प्रकल्प संचालक ,जल जीवन मिशन, पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या टीमने कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील प्रत्येकी दोन गावांची तपासणी करण्यात आली.
. यामध्ये आजरा तालुक्यातील ग्रामपंचायत खानापूर या ग्रामपंचायतीने २०० गुणांपैकी १९० गुण मिळवून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. सदर बक्षीस मिळवणे कामी ग्रामपंचायतचे सरपंच कल्पना डोंगरे, उपसरपंच आनंदा राणे, ग्रामपंचायत अधिकारी, विशाल दुंडगेकर, ग्रामपंचायत सदस्य विश्वास जाधव, युवराज जाधव, श्रीमती माधुरी गुरव, सौ अलका चव्हाण, सौ सुशीला जाधव ,सौ सीताबाई दोरूगडे यांनी विशेष प्रयत्न केले.सदर जिल्हास्तरीय समितीमार्फत ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, गावातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ,वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय शालेय शौचालय गावातील परिसर याची पाहणी करण्यात आली.

खानापूर ग्रामपंचायतीला सदर अभियानांतर्गत रक्कम रुपये सहा लक्ष इतके बक्षीस मिळवले आहे. याव्यतिरिक्त स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन यासाठी रक्कम रुपये पन्नास हजार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार अंतर्गत पाणी गुणवत्ता व व्यवस्थापनासाठी रक्कम रुपये पन्नास हजार असे दोन विशेष पुरस्कार ग्रामपंचायत खानापूर यांना देण्यात आलेले आहेत. यासाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती आजरा संजय ढमाळ, बी.टी.कुंभार विस्तार अधिकारी आबासाहेब मासाळ, विस्तार अधिकारी पंचायत यांचे मार्गदर्शन लाभले.
