🟥सुनिता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर परतणार.- नासाकडून गूड न्यूज
🛑अपंगांच्या विविध मागण्यांसाठी तहसिलदार व पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा – नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार – संग्राम सावंत..
वाँशिंग्टन :- वृत्तसंस्था.
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स या गेल्या वर्षी ५ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेल्या हाेत्या. तेव्हापासून त्या तिथेच अडकल्या आहेत. पण आता ‘नासा’ने सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीवर परतण्याबाबत एक गूड न्यूज दिली आहे. नासाने म्हटले आहे की, अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अपेक्षेपेक्षा काही दिवस आधीच अंतराळातून परत आणले जाईल.
🟥नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर यांना घेवून बोइंग कंपनीचं ‘स्टारलायनर’ अंतराळयान ५ जून २०२४ रोजी अवकाशात झेपावलं होतं. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून एक किंवा दोन आठवड्यांत ते परततील, अशी अपेक्षा नासाने व्यक्त केली होती. मात्र, आठ महिने उलटले तरी अद्याप ‘स्टारलायनर’ पृथ्वीवर परतलं नाही. नासाने म्हटलं आहे की, स्पेसएक्स अंतराळवीर उड्डाणांसाठी कॅप्सूलची जागा घेईल. बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या ऐवजी मार्चच्या मध्यात घरी परत आणता यावे म्हणून हा बदल करण्यात आला आहे. दोन्ही अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मुक्काम दोन आठवड्यांनी कमी होईल.
🔴नासाने म्हटले आहे की, सुनीता विल्यम्स आणि बुच बिल्मोर हे अपेक्षेपेक्षा लवकर परत येतील. आता त्यांना आणण्यासाठी १२ मार्च रोजी कॅप्सूल लाँच केले जाईल. स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूल बदलण्याचा पर्याय निवडल्यामुळे अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. आता कॅप्सूल १२ मार्च रोजी “मिशनच्या तयारीच्या अधीन” लाँच होईल. याचा अर्थ असा की, नवीन तारीख विल्यम्स आणि विल्मोरच्या नियोजित परतीच्या दिवसांच्या आधीची असण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांना सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्याचे मिशन लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले होते.

🛑अपंगांच्या विविध मागण्यांसाठी तहसिलदार व पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा – नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार – संग्राम सावंत..
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथे गुरुवार दि.20 फेब्रुवारी,2025 रोजी तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती कार्यालय संघर्ष मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन नगरपंचायत कार्यालय आजरा याबाबतची निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अपंगांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी तहसीलदार व मुख्याधिकारी,नगरपंचायत व गटविकास अधिकारी, आजरा यांना निवेदन देऊन चर्चा केली.
मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने खालील अपंगांच्या-दिव्यांगांच्या बाबतीतील सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून कायदेशीररित्या त्याची ताबडतोब सोडवून करावी. अपंगांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी तहसीलदार, मुख्याधिकारी, नगरपंचायत व गटविकास अधिकारी आजरा यांना निवेदन देऊन चर्चा केली. याबाबतीत तहसीलदार, मुख्याधिकारी, नगरपंचायत व गटविकास अधिकारी आजरा यांनी सकारात्मकरित्या प्रश्न सोडवण्यासाठीचा पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावले नाहीतर, आम्ही याबाबतीत अपंगांच्या विविध मागण्यांसाठी तहसिलदार व पंचायतसमिती कार्यालयावर मोर्चा व नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत.
मागण्यांच्या बाबतीत मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने दिव्यांग- अपंगांना देण्यात येणाऱ्या पेन्शन योजनेबाबतीत त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात वेळोवेळी आणि वेळच्या वेळी जमा झाली पाहिजे. यासाठी दिव्यांगांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. यासाठी आपण दिव्यांगांच्या पेन्शन बाबतीत जे अडथळे आहेत ते दूर करून त्यांची पेन्शन जर महिन्याला त्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा झाली पाहिजे. तशीच दिव्यांगांच्या इतर मागणीबाबत आपण लक्ष घालून संबंधित सर्व विभागांना याबाबतीत सूचना करून याबाबतीतील बैठक लावून संघटनेबरोबर चर्चा करून या प्रश्नाची सोडवणूक करायला हवी आहे. मात्र आजपर्यंत कोणत्याही अधिकारी यांनी पुढाकार घेतलेला नाही.त्यामुळे संघटनेला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. या निवेदनात विविध मागण्या केलेल्या आहेत. या मागणीने इतर सोळा मागण्यासाठी आंदोलन होणार आहे. यावेळी मुक्ती संघर्ष समितीच्या राज्याध्यक्ष संग्राम सावंत,असंघटित कष्टकरी कामगार संघटनेचे नेते सुनिल अहिरे,समीर खेडेकर,मजीद मुल्ला,रविंद्र भोसले,भारती पवार,रूजाय डिसोझा,अबु माणगावकर, संजय डोंगरे, यलुबाई गोंधळी,बबन चौगुले,अहमद नेसरीकर,दिलीप कांबळे, इम्तियाज दिडबाग, आसिफ मुजावर, अमिन कानडीकर, गौस माणगावकर, सुलेमान दरवाजकर,बबन कुरळे, आबुहुरेरा मानगावकर, जगदीश कुरुणकर, अरिफा तांबोळी सुमिता चंदनवाले, रिजवाना इंचनाळकर, राहूल दास व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
