Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमनपदी.- सुभाष देसाई यांची निवड.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमनपदी.- सुभाष देसाई यांची निवड.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमनपदी.- सुभाष देसाई यांची निवड.


आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या आज झालेल्या मा. संचालक मंडळ सभेमध्ये रिक्त असलेल्या व्हा. चेअरमन या पदावर कारखान्याचे संचालक सुभाष गणपतराव देसाई रा. सिरसंगी यांची बिनविरोध निवड झाली. सदरची सभा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग कोल्हापुर यांचे प्रतिनिधी .व्ही.एम.पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. व्हाईस चेअरमन पदासाठी सुभाष देसाई यांचे नांव माजी उपाध्यक्ष मधुकर देसाई यांनी सुचविले त्यास जेष्ठ संचालक विष्णु केसरकर यांनी अनुमोदन दिले.

यावेळी जेष्ठ संचालक मुकुंदराव देसाई, यांनी आपल्या मनोगतात.ना हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ एकमताने काम करीत असुन यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून कारखाना यशस्वीपणे चालविणेसाठी प्रयत्न राहतील असे सांगीतले तर माजी व्हा. चेअरमन. मधुकर देसाई यांनी.ना.हसन मुश्रीफ व संचालक मंडळ आणि अधिकारी व कर्मचारी यांनी व्हाईस चेअरमन पदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्याबदद्ल आभार व्यक्त केले. नुतन उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी वेळ देवुन काम करणार असल्याचे सांगीतले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक उदयसिंह पोवार, अनिल फडके, श्री.दिपक देसाई,.रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे). शिवाजी नांदवडेकर,.राजेश जोशीलकर. गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ.मनिषा देसाई, संचालक श्री. काशिनाथ तेली,.हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक. नामदेव नार्वेकर. रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी. दिगंबर देसाई आणि प्र.कार्यकारी संचालक .व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.