हत्तीने केलेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी.- अन्यथा आंदोलन.- आजरा शिवसेना.
आजरा. प्रतिनिधी. ०९
आजरा तालुक्यातील गवसे विभागासह काही भागात हत्ती या वन प्राण्याने शेतामध्ये शेतपिकात धुमाकूळ घालून शेत पिकाचे नुकसानीचे सत्र सुरू आहेच. ज्या शेतकऱ्यांचे शेत पिकांचे नुकसान झालेले पंचनामे केले आहेत अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ताबडतोब मिळावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने वन विभागाला निवेदनाने दिला आहे.
तसेच गवसे तालुका आजरा या विभागात हत्तीचे माहेर घर असल्याने या भागातील शेतकऱ्यांना हत्ती या प्राण्यांपासून नेहमीच शेत पिकासाठी नुकसानीचा ठरत आहे. यासाठी वन विभागाने हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत उपप्रमुख संजय पाटील, शिवाजी आडाव, तसेच अक्षय कांबळे सह शिवसैनिकांच्या सह्या आहेत.