महाविद्यालयांनी संस्थाचालकांनी शैक्षणिक ‘फि’ चा तगादा थांबवावा.- युवा सेना आजरा.
आजरा. प्रतिनिधी. ०९
आजरा येथील काही
महाविद्यालयांच्या संस्थाचालकांनी शैक्षणिक फि सक्ती थांबवुन परीक्षा फॉर्म भरून घ्यावे अशा आशयाचे निवेदन आजरा तहसीलदार यांना युवा सेना आजरा यांनी दि. ०८ रोजी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आजरा येथील काही महाविद्यालय संस्था चालक यांनी गेल्या एक- दिड वर्षापासून आज अखेर महाविद्यालय कोरोणाच्या पार्श्वभूमीवर बंद असताना चालु वर्षासाठी. सध्या महाविद्यालय चालू होण्याच्या मार्गावर असताना तालुक्यातील काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्याकडून परीक्षा फॉर्म भरून घेताना शैक्षणिक फि सक्ती केली जात आहे.
देशात लाँकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक परिस्थिती राहिलेली नसताना महाविद्यालय शैक्षणिक ‘फि’ साठी विद्यार्थ्यांना तगादा लावून फि बाबत सक्ती करत असल्याचे समजते तरी पालकांची परिस्थिती समजून घेऊन संस्थाचालकांनी चालू वर्षाची विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी व विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण न करता विद्यार्थ्यांना सहकार्य करावे अशी विनंती महाविद्यालयीन संस्थाचालकांना करण्यात आली आहे. या निवेदनावर सुधीर सुपल, अनिकेत पाटील, तेजस लोहार अक्षय कांबळे शुभम खोराटे ओमकार चौगुले सह युवासेनेच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.