कराडला उद्यापासून सर्व दुकाने उघडणार व्यापाऱ्यांचे प्रांत, तहसीलदारांना निवेदन दंड केल्यास आंदोलन करण्याचा इशारा
कराड. – प्रतिनिधी.
शहरातील सर्व प्रकारची दूकाने बुधवार पासून (७ जुलै) सकाळी ९ ते ४ या वेळेत उघडणार असुन कोणता ही दंड मान्य करणार नाही, दंड केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा देत विविध मागण्यांचे निवेदन शहरातील व्यापाऱ्यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे व तहसिलदार अमरदीप वाकडे यांना दिले. यावेळी लॉकडाऊन हटवा व्यापयांना वाचवा, न्याय द्या, न्याय द्या छोट्या दुकानदारांना न्याय द्या, मत छिनो हमारा कारोबार… हमारा भी है घर परिवार… असे फलक हाती घेवून व घोषणा दिल्या. कर कसे भरायचे…? लोक रोज घरी येत आहेत त्यांना काय उत्तर द्यायचे. आता घाण ठेवायला ही काही शिल्लक राहिले नाही. लॉकडाऊन लागून आत्महत्या करण्यापेक्षा ते कोरोनाने मेलेलं बरं असेच आता वाटू लागले आहे. आपण सर्वजण सर्वसामान्य लोकांचा विचार न करता राजकारण करत आहे असेच दिसत आहे. आपणाकडून काय उत्तर मिळणार ? त्यामूळे लॉकडाउन आदेश रद्द करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कराड व्यापारी महासंघ व कराड तालुका दक्ष नागरिक संघाने निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी शहरातील व्यापारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कराड प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारती समोर व्यापाऱ्यांची झालेली गर्दी. पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन यांनाही दिले जाणार आहे. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेला मनसेने ही पाठिंबा दिला आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनातील माहिती अशी, सातारा जिल्ह्यात पुन्हा ३ जुलैला लॉकडाऊन लागू केला आहे. दोन जुलै पर्यंत कृष्णा कारखाना निवडणूक सुरू होती. त्यासाठी हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर होते. त्यावेळी आपण लक्ष दिले नाही आणि निवडणूक संपली की लगेच लॉकडाऊन लागू केले. सामान्य लोकांनी कसे जगायचे हे तरी आपण सांगा. जगायचे हे तरी आपण सांगा. एक तर कामधंदा नाही, त्यात महागाई वाढली आहे. त्यात कर्जाचे हप्ते, दुकान घर – भाडे, लाईट बिल, विविध समस्या सध्या व्यापाऱ्यांना सोसाव्या लागत आहेत