विहिरीत तोल जाऊन १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू.
कागल प्रतिनिधी
विहिरीत तोल जाऊन पडून वय १७ वर्ष अल्पवयीन तरुणाचा मृत्यू झाला.
महेश कृष्णात तेलवेकर (राहणार पिंपळगाव खुर्द तालुका कागल)असे मयत तरुणाचे नाव आहे .ही घटना मगदूम मळा येथे सकाळी आठ वाजता घडली .या घटनेची नोंद कागल पोलिसात झाली आहे .
पोलिसांच्या माहितीनुसार महेश यास वानरांच्या पाठीमागे धावणेचा त्याला नाद होता .तो मतिमंद असलेची चर्चा आहे.तो सकाळी विहिरीजवळ गेला असता त्याचा तोल गेला ,आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.कागल पोलिसात नोंद करण्यात आली आहे .पुढील तपास उपनिरीक्षक दीपक वाकचौरे करीत आहेत.