आजरा बसस्थानका शेजारी रिक्षा स्टँडसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.- तहसीलदार यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा शहरात राष्ट्रीय महामार्ग होणेपूर्वी रिक्षा स्टैंडसाठी बस स्थानकासमोर जागा उपलब्ध करून दिली होती. महामार्गाचे काम चालु असताना रिक्षा लावणेसाठी जागा उपलब्ध नसलेने आजरा आगार प्रमुखांनी रिक्षा लावणेकरिता बसस्थानकामध्ये तात्पूरती सोय म्हणून परवानगी दिली होती. परंतु आता महामार्ग रस्ता पूर्ण झाला असलेने आगार प्रमुखांनी रिक्षा बसस्थानकामध्ये उभ्या करणेस मनाई केली आहे. म्हणून रिक्षा चालकांनी महामार्ग होणेपूर्वी ज्याठिकाणी रिक्षा उभ्या करत होते त्याठिकाणी उभ्या करण्यास सुरुवात केली. परंतु महामार्ग अधिकाऱ्यांनी वाहतुकीस अडथळा होत असलेने सदर ठिकाणी रिक्षा उभ्या करण्यास मनाई केली आहे. यामुळे आता रिक्षा धारकांनी आपले वाहन कुठे उभे करावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आजरा तहसीलदार यांना अन्याय निवारण समिती व रिक्षा चालक-मालक यांनी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा शहरात एकुण ५६ रिक्षा आहेत. सदर रिक्षाचालकांचा उदरनिर्वाह रिक्षा व्यवसायावरच चालतो, रिक्षा चालकांनी चार ते पाच लाख रुपये गुंतवुन सदरचा व्यवसाय चालु केला आहे. यावरच त्यांची रोजी-रोटी चालु आहे. म्हणून आजरा बसस्थानक शेजारी रिक्षा स्टैंडसाठी जागा उपलब्ध करून दिलेस रिक्षा चालकांना व एस.टी. प्रवाशांना सोयीचे होणार आहे. पूर्वी आजरा बसस्थापनका शेजारी नाईक गल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर रिक्षा उभ्या करण्यात येत होत्या. परंतु आता त्या ठिकाणी नगरपालिकेने छोट्या व्यवसायिकांना खोकी उभारून व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांचे अतोनात हाल होत आहेत. त्याचाप्रमाणे बस प्रवाशांचे सुध्दा हाल होत आहेत. त्यामुळे बस स्थापकासमोरील पथमार्ग व त्याच्या शेजारील दिडफुट महामार्गाची जागा व कमी पडणारी दिडफुट जागा बसस्थानकातील मिळणेसाठी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व महामार्गाचे अधिकारी यांचेशी चर्चा करून आजरा आम्हाला त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी.

बसस्थापनक समोरील रिक्षा स्टँडचा प्रश्न निकाली काढण्यात आपले स्तरावर प्रयत्न व्हावेत अशी आजरा रहिवाशी अन्याय निवारण समिती, आजरा रिक्षा संघटना, आजरा प्रवासी संघटना यांचे मार्फत विनंती करणेत येत आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष नाथ देसाई, मिनीन डिसोझा, बंडोपंत चव्हाण, दयानंद भोपळे, रिक्षा संघटना अध्यक्ष – रवी तेंडुलकर., उपाध्यक्ष – समीर चौगले., खजिनदार – समीर चौगले., इरफान शेख., सेक्रेटरी – पुंडलिक कोले, नामदेव घेवडे, राहुल सुतार, तनवीर मकानदारअजित नाईक, समीर तीळगुळे सह अन्याय निवारण समिती व रिक्षा संघटना अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांच्या सह्या आहेत.
