बिगरशेती (NA) बाबत तत्कालीन तलाठी यांची सखोल चौकशी न झाल्याने.- “जन आंदोलन” मुक्ती संघर्ष समिती -संग्राम सावंत
( बुरुडे (ता. आजरा) येथील नविन वसलेल्या भावेश्वरी कॉलनीमधील सर्व बिगरशेती प्रकरणी होणार आंदोलन)
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील N.A. प्रकारांची सखोल चौकशी होणार आहे. का.? नाही यासाठी नुसता पत्रव्यवहार चालला आहे याबाबत ती ठोस कारवाई आजपर्यंत झालेली नाही.
मागण्यांबाबत ठोस कारवाई झाली नाही. तर तहसिलदार कार्यालय आजरा यांच्या आवारात ” मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने २४ फेब्रुवारी, २०२५ रोजी “जन आंदोलन ” करणार असल्याचे निवेदन संग्राम सावंत राज्याध्यक्ष – मुक्ती संघर्ष समिती यांनी तहसीलदार आजरा यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बुरुडे (ता. आजरा) येथील नविन वसलेल्या भावेश्वरी कॉलनीमधील सर्व बिगरशेती NA गट क्रमांक यामध्ये निवासी रहिवासाकरीता अकृषक (NA) प्लॉट तयार करून जागा मालकांनी विक्री केली. पण येथे पायाभुत सुविधा दिलेल्या नाहीत. त्या सुविधा द्याव्यात अशी मागणी येथील रहिवाशांनी या केलेली आहे. व होती. याबाबतचे याअगोदर भावेश्वरी कॉलनी, बुरूडे आजरा जि.कोल्हापूर येथील रहिवाशांनी निवेदन आजरा तहसीलदार, आजरा यांना दिलेले आहे.मात्र यावर ठोस कार्यवाही केली नाही.
संबंधित जागा मालकांनी प्लाट अकृषक(बिगरशेती-NA) करून राहण्यासाठी विकले. पण तेथे गटर्स, रस्ते, वीज पुरवठा या पायाभूत सुविधा दिलेल्या नाहीत. संबंधीत जागामालकांनी अशा कोणत्याही सेवासुविधा न देता या प्लॉटमधील रहिवाशांची फसवणूक केली आहे. सध्या आपआपल्या खरेदी प्लॉटमध्ये नागरिकांनी गरजेपोटी घरे बांधली आहेत. परंतु घरांचे सांडपाणी किंवा ये जा करण्यासाठी रस्ते किंवा लाईट्स याची कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा दिलेल्या नाहीत. जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन आम्हा रहिवाश्यांना मंडळ अधिकारी गेले आहेत.पण न्याय मिळाला नाही.यासाठी खालील मागण्यांबाबत आम्ही बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहोत.

या निवेदनातील मागण्या
१) आजरा येथील विद्यमान तलाठी शिवराज देसाई यांची आजरा येथे नेमणूक झाल्यापासून यांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या डायरी उतारे घालणे, पोटहिस्से व करणे, फेरफार घालणे, कलम ८५ नुसार नोंदी करणे तसेच बोगस बिगर शेती प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर रित्या उत्खनन सुरू आहे या सर्वांची सखोल बिनचूक अशा अनेक गोष्टींची चौकशी झाली पाहिजे..।।
२) तलाठी यांच्या कालावधीतील सर्व दप्तर तपासणी झाली पाहिजे. तसेच खालील मागण्यांची चौकशी समिती नेमून चौकशी झाली पाहिजे….
३)बुरुडे (ता. आजरा) येथील नविन वसलेल्या भावेश्वरी कॉलनीमधील येथील रहिवाशी लोकांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत.भावेश्वरी कॉलनीमधील संबंधित जागा मालकांनी रहिवाशी प्लॉटधारकांना अकृषक (बिगरशेती) NA करून राहण्यासाठी विकले. पण तेथे गटर्स, रस्ते, वीज पुरवठा या पायाभूत सुविधा दिलेल्या नाहीत. NA प्लॉटधारकांना रस्ता व गटर्स यांच्या सोयी उपलब्ध नसल्याने त्यांना पावसाळ्यात व इतर ऋतूमध्ये नाहक त्रास होत आहे. यासाठी त्या कॉलनीमध्ये ताबडतोब रस्ता व गटर्स व इतर पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत.त्यांचा तो अधिकार आहे.
४)तत्कालीन नायब तहसिलदार डी.डी.कोळी यांच्या सह्यांच्या आधारे त्यांच्या काळातील सर्व बिगरशेती (N.A. ) प्रकरणांची कायदेशीररित्या चौकशी करून.त्यांच्यासह संबंधित शिवराज देसाई तलाठी व सर्कल पाटील साहेब आणि इतर सर्व संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत!
५)खालील मुद्दांच्या आधारे आजरा तालुक्यातील जि. कोल्हापूर येथील सन-२०१० ते सन -२०२३ आजपर्यंत बिगरशेती NA केलेल्या तालुक्यातील सर्व गट नंबर प्रकरणांची परिपूर्ण चौकशी झाली पाहिजे! तसेच बिगरशेती NA सर्व गट नंबर मधील फेरफार कसे घातले आहेत. याबाबतीत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी आणि NA संदर्भातील आदेश (ऑर्डर) कशा झालेल्या आहेत. याबाबतीत तत्कालीन सर्व तहसिलदार याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
६)आता पर्यंत मा.उपविभागीय अधिकारीसो, गारगोटी जि.कोल्हापूर आणि मा.तहसिलदारसो, आजरा यांनी केलेल्या कार्यवाहीचा स्वयंस्पष्ट पुराव्यानिशी अहवाल सादर केला आहे की नाही.याबाबतीत खुलासा मिळणे बाबत….
७ )वरील तिन्ही विषयांच्या, खालील मुद्द्यांच्या आधारे मा.उपविभागीय अधिकारीसो, आजरा भुदरगड उपविभाग, गारगोटी जि.कोल्हापूर यांनी “चौकशी समिती” नेमून याबाबतीत कार्यवाही व कारवाई करण्यात यावी .
तसेच वरील विषय क्रमांक - २ व ३ नुसार खालील मुदयांच्या आधारे कोल्हापूर जिल्ह्या आजरा तालुक्यातील सर्व बिगरशेती (N.A.) प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.सर्व संबंधित दोषींवर कारवाई केली पाहिजे.त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे.
(१)बिगरशेती करण्यासाठी आलेले गट नं, अर्ज व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांची चौकशी व्हावी!

(२) डी. डी. कोळी तत्कालीन नायब तहसिलदार यांच्याकडे तहसिलदार, आजरा म्हणून कार्यभाग असताना बिगरशेती प्रकरणांचे आदेश, मंजूरी व त्यासंदर्भात झालेला पत्रव्यवहार आणि कागदपत्रांची सखोल तपासणी करावी!
(३) बिगरशेती (N.A) करताना करावयची परिपूर्ण कार्यवाही झालेली आहे का? याची चौकशी व्हावी-
अ) डाउन प्लॅनिंगची मंजूरी आहे का?
बं) बिगरशेती करताना वरिष्ठांचे आदेश बेतले आहेत का? क) ओपन स्पेस व इतर गोष्टी आणि रस्त्यासाठी जागा सोडल्या आहेत का?
ड) बिगरशेतीसाठी नियमानुसार नकाशा तयार केला आहे का? लेआउट मंजूर आहे का?
(४) सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून केलेल्या बिगरशेती (N.A.) प्रकरणांच्या आदेशांची चौकशी करा!
(५) ग्रीन झोनमध्ये झालेल्या बिगरशेती (N.A.) प्रकरणांच्या आदेशांची चौकशी करा!
(६) बिगरशेती (N.A.) करताना कोणकोणाच्या N. O. C. नाहरकत प्रमाणपत्र घेतलेली आहेत. याची सखोल चौकशी झाली पाहिजे!
(७) आजरा तालुक्यात वर्ग-२ च्या जमिनींचे बिगरशेती (N.A.) झाले आहे का? याची चौकशी व्हावी!
(८) बिगरशेती झालेल्या पोटहिस्साचे फेरफार व त्यासंदर्भातील ७/१२ फोरची चौकशी झाली पाहिजे!
(९)ओढा/नदी असताना १०० मीटरपर्यंत बिगरशेती झालेल्या प्रकरणांची चौकशी व्हावी!
(१०) बिगरशेती (N.A.) प्रकरणांचे झालेले आदेश व त्यासंदर्भातील झालेला अंमल याची चौकशी व्हावी!
(११) कायदेशीर व बेकायदेशीररित्या झालेल्या बिगरशेती (N.A.) प्रकरणातील सर्व आदेश व त्या अंमलानुसार झालेल्या सर्व प्रक्रियांची सखोल चौकशी व्हावी!
(१२) बिगरशेती NA सर्व गट नंबर मधील फेरफार कसे घातले आहेत. या NA संदर्भातील आदेश (ऑर्डर) कशा झालेल्या आहेत. याची सखोल चौकशी झाली पाहिजे!
वरील मुद्दांच्या आधारे आजरा तालुक्यातील सर्व बिगरशेती NA प्रकरणांची सविस्तर, बनिचूक सखोल चौकशी करून सर्व संबंधितीच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. यामध्ये दप्तर दिरंगाई व हलगर्जीपणा वेळकाढूपणा होऊ नये. यांची दक्षता आपण घ्यावी. तसेच ताबडतोब बुरुडे (ता. आजरा) येथील नविन वसलेल्या भावेश्वरी कॉलनीमधील येथील रहिवाशी लोकांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष संग्राम सावंत यांच्यासह मेघाराणी भाईंगडे, दिंगबर विटेकरी, समीर खेडेकर, संजय कांबळे, मजीद मुल्ला, राहुल दास, लक्ष्मी कांबळे, अक्षय कांबळे, भारती पवार, जयश्री कांबळे, रामचंद्र कांबळे, मंगल कांबळे, सारिका चव्हाण, रामा कांबळे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.
