Homeकोंकण - ठाणेपुण्यात जीबीएसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू.- रुग्णांची संख्या १७३ वर पोहचली🛑फेरीवाले, पथारी...

पुण्यात जीबीएसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू.- रुग्णांची संख्या १७३ वर पोहचली🛑फेरीवाले, पथारी (पथविक्रते) व्यावसायिकांचे योग्य व सुरक्षित अन्यथा आंदोलन – संग्राम सावंत. ( मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने ठिय्या आंदोलनाचा इशारा. ).

🟥पुण्यात जीबीएसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू.- रुग्णांची संख्या १७३ वर पोहचली
🛑फेरीवाले, पथारी (पथविक्रते) व्यावसायिकांचे योग्य व सुरक्षित अन्यथा आंदोलन – संग्राम सावंत. ( मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने ठिय्या आंदोलनाचा इशारा. ).

पुणे :- प्रतिनिधी.

पुण्यात गुलेन बॅरे सिंड्रोमच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात ६२ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सहा झाली आहे. राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्याही १७३ वर पोहोचली आहे. पुण्यातील रुग्णालयात 63 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसने बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. मृत व्यक्ती कर्वेनगरमधील रहिवासी होती. 28 जानेवारीला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ताप, जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास होता. त्यांना आयव्हीआयजी इंजेक्शन देण्यात येत होते. बुधवारी अस्वस्थ वाटू लागले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जीबीएसमुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात ४ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

🔴मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये गेल्या २४ तासांत नव्याने जीबी सिंड्रोम आजाराची लागण झालेले तीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या १७३ वर पोहोचली आहे. मागील तीन दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत असून, गुरूवारी १० रुग्ण बरे झाले. पुणे शहर आणि जिल्ह्यात १७० संशयीत जीबीएस बाधित रुग्णांपैकी १४० रुग्णांना जीबीएस झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. जीबी सिंड्रोम बाधितांमध्ये ३४ रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून, सर्वाधिक रुग्णसंख्या ८७ ही समाविष्ट गावातील आहे. २२ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका, २२ रुग्ण पुणे ग्रामीण तर ८ रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहेत. उपाचारासाठी दाखल रुग्णांपैकी ५५ रूग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असून २१ रूग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.

🛑फेरीवाले, पथारी (पथविक्रते) व्यावसायिकांचे योग्य व सुरक्षित अन्यथा आंदोलन – संग्राम सावंत. ( मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने ठिय्या आंदोलनाचा इशारा. )

गडहिंग्लज.- प्रतिनिधी.‌

पथविक्रते यांचे विकसनशील व योग्य सुरक्षित पुनर्वसन झालेली नाही.असे असताना गडहिंग्लज नगरपरिषद, गडहिंग्लज बेकायदेशीर रित्या व बळाच्या जोरावर जर पथविक्रते यांना जागा खाली करा. असा तोंडी अगर लेखी आदेश देऊन त्यांना फुटपाथवरून काढणार असाल तर आम्ही मुक्ती संघर्ष समिती या संघटनेच्या वतीने  गडहिंग्लज नगरपरिषद,गडहिंग्लज यांच्या कार्यालयासमोर येत्या १० दिवसात ‘बेमुदत ठिय्या आंदोलन’ करणार असल्याचे निवेदन मुक्ती संघर्ष समितीने दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज; तहसिलदार गडहिंग्लज; मुख्याधिकारी , गडहिंग्लज नगरपरिषद गडहिंग्लज यांना आज निवेदन देऊ त्यांच्याबरोबर चर्चा केली.

मागण्यांबाबतीत अंमलबजावणी व कार्यवाही झाली पाहिजे.मात्र तशी आतापर्यंत पूर्वी दिलेल्या निवेदनावर अंमलबजावणी झालेली नाही.उलट आपण आपण बेकायदेशीररित्या व बळाच्या जोरावर जर पथविक्रते यांना जागा खाली करा.असा तोंडी अगर लेखी आदेश देऊन काढणार असाल तो पथविक्रेते यांच्यावर अन्याय करणारा आहे असा अन्याय करणारा निर्णय आपण घेता कामा नये कारण त्यांचे विकसनशील व योग्य सुरक्षित पुनर्वसन झालेली नाही. याची आपण नोंद घ्यावी.

निवेदनात केलेल्या मागण्या, गडहिंग्लज नगरपरिषदेने केंद्र सरकारचा “राष्ट्रीय फेरीवाला कायदा” आणि राज्य सरकारने ही “पथ विक्रेता अधिनियम” बनवला आहे.याची काटकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे!;गडहिंग्लज नगरपरिषदेने प्रशासनाने “राष्ट्रीय फेरीवाला कायदा” आणि “पथ विक्रेता अधिनियम” याची आजपर्यंत कोणती कोणती अंमलबजावणी सर्व झाली आहे की नाही? याबाबत सविस्तर माहिती लेखी स्वरूपात आम्हाला माहिती मिळालीच पाहिजे.; गडहिंग्लज नगरपरिषदेने शहरातील सर्व फेरीवाल्यांचे, भाजीपाला विक्रेते व पथारी व्यावसायिकांचे आणि वस्त्यांमधील विक्रेते, हंगामी फेरीवाले,आठवडे बाजारातील शेतकरी यांचे सर्वेक्षण करून वयोगानुसार त्यांची वर्गवारी करावी. ;फेरीवाल्यांच्या व पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी सुरक्षित झोन तयार करावा. या मागण्यांसह अनेक मागण्या संघटनेच्या वतीने केलेल्या आहेत

        केंद्र सरकारने केलेल्या “राष्ट्रीय फेरीवाल कायदा” आणि राज्य सरकारने केलेला “पथविक्रेता अधिनियम” अजून कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासनाने पूर्णपणे लागू केला आहे की नाही? याबाबत कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. राजकीय हितसंबंध जपण्यासाठी या कायद्याची मोडतोड न करता. गडहिंग्लज नगरपरिषद प्रशासनाने याबाबत कायदेशीर योग्य भूमिका घेऊन पुनर्वसन केले पाहिजे. त्यानुसारच निवडणुका घेतल्या पाहिजेत.

        मागण्या याबाबत ठोस भूमिका घेऊन.अंमलबजावणी व कार्यवाही झाली पाहिजे.मात्र तशी आतापर्यंत पूर्वी दिलेल्या निवेदनावर अंमलबजावणी झालेली नाही.उलट आपण आपण बेकायदेशीररित्या व बळाच्या जोरावर जर पथविक्रते यांना जागा खाली करा.असा तोंडी अगर लेखी आदेश देऊन काढणार असाल तर आम्ही मुक्ती संघर्ष समिती या संघटनेच्या वतीने गडहिंग्लज नगरपरिषद,गडहिंग्लज यांच्या  कार्यालयासमोर येत्या 10 दिवसात ‘बेमुदत ठिय्या आंदोलन’ करणार आहोत. यावेळी मुक्ती संघर्ष समिती राज्याध्यक्ष संग्राम सावंत; दिंगबर विटेवरी, गायत्री रणदिवे, संतोष पोवार, वसंत शेटके, रमेश शिंगे, अमर रणदिवे, सुनीता मगदूम, वैशाली दड्डीकर, तानाजी सावंत, रेखा पाटील, राजू कांबळे, अक्षय कोरवी,जावेद पटेल,करण कोरवी, मीनाक्षी कोरवी, सविता पवार,सरिता पवार,सादिक शेख, सादिक देसाई, सुनिल मगदूम, आरिफ मकानदार, पप्पू चौगुले, विनायक कांबळे, राहूल दास, हेमंत जाधव आदी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.