देवर्डे. ता. आजरा ग्रामस्थ अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत. देवर्डे येथील रस्ता प्रश्न अद्याप प्रलंबितच. ( मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर रस्ता खुला करून कारवाई करणे संदर्भात निर्णय दिला असताना देखील..का? मिळत नाही न्याय. )
🛑जाहीर आवाहन :- आजरा नगरपंचायत, आजरा प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 👇
आजरा.- प्रतिनिधी.
देवर्डे ग्रामस्थ ह्यांनी मनसे आजरा वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ( जि. प. कोल्हापूर ) यांचेकडे वहीवाट रस्ता खुला करून पूर्ववत करणे व शासकीय मालमत्ता नुकसान प्रकरणी गुन्हा नोंद व्हावा. या मागणीकरिता दाद मागितली होती. या विषयाबाबत देवर्डे ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्र काढले आहे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
वरील तक्रारीच्या अनुषंगाने दि. ४/११/२०२४ रोजी. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांनी सदर रस्ता खुला करून कारवाई करणे संदर्भात निर्णय दिला असताना. ग्रामपंचायत देवर्डे व प्रशासन ह्यांचेकडून गेली ३ महिने झाले असताना अद्याप कोणतीच कारवाई अथवा अंमलबजावणी करून ग्रामस्थांना दिलासा मिळाला नाही.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांचा निर्णय झाला असताना देखील न्याय मिळत नसेल व निर्णयाची अंमलबजावणी होत नसेल तर न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न आमचे समोर आहे. मनसे यांनी सदर प्रश्नाला वाचा फोडली व निर्णय झाला पण प्रशासन व ग्रामपंचायत जाणीवपूर्वक अंमलबजावणी करीत नाहीत. असा आरोप आम्ही करत आहोत.
यामागे आर्थिक कि राजकीय हितसंबंध जपले जात आहेत का? अशी शंका आमचे मनामध्ये उपस्थित होत आहे.
पण सामान्य जनतेला वेठीस धरून असे कोणते हित जपले जात आहे हे ही समजतं नाही. रस्त्यामुळे अडचणीना सामना करावा लागत असुन प्रशासनाला वारंवार परिस्थिती ची जाणीव करून देखील बेदखल करण्यात येत आहे. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे. या प्रसिद्धी पत्रकावर संतोष शिवगंड, अभिजित होडगे, संजय तेजम, अजित शिवगंड, नामदेव तेजम
काशिनाथ शिवगंड, शिवाजी सोले, पांडुरंग शिवगंड यांच्या सह्या आहेत.

🛑जाहीर आवाहन :- आजरा नगरपंचायत, आजरा प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 👇
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत हद्दीतिल सर्व नागरिकांना आजरा नगरपंचायत व मुख्याधिकारी यांनी यांनी वाहन केले आहे. कि केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 आजरा शहरासाठी लागू झाली आहे. या योजनेंतर्गत सर्व प्रवर्गातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बेघर कुटुंबांना त्यांच्या स्वमालकीच्या जागेवर नवीन घरकुल बांधणेस प्रति लाभार्थी रक्कम रु. 2.5 लक्ष अनुदान प्राप्त होणार आहे. तरी नवीन घरकुल बांधणीकरिता इच्छुक लाभयर्थ्यांनी आजरा नगरपंचायतशी संपर्क साधावा, असे आवाहन करणेत येत आहे.
पात्रता:-
1) अर्जदार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ज्यांचे कौटुंगिक वार्षिक उत्पन्न 3 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी) असावा.
2) अर्जदाराची स्वमालकीची जागा असावी.
3) अर्जदाराचे स्वतःचे किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे.
4) अर्जदाराने किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने गेल्या 20 वर्षात शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा उच्च लाभ घेतलेला नसावा.
5) नवीन नियोजित घराचे बांधकाम 30 चौ. मी. ते 45 चौ. मी. चटई क्षेत्रफळापर्यंत असावे.
टीप:- ऑनलाईन नोंदणी करिता इच्छुक लाभार्थ्यांनी
https://pmaymis.gov.in/pmaymis2 2024/PmayDefault.aspx या वेबलिंक वर नोंदणी करून विहित मुदतीत आपला प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह आजरा नगरपंचायतच्या बांधकाम विभागाकडे सादर करावा. असे आवाहन आजरा नगरपंचायत मुख्य अधिकारी सुरज सुर्वे यांनी केले आहे.

