Homeकोंकण - ठाणेअजित पवार आले नसते तर आमचे १०० आमदार जिंकून आले असते.- गुलाबराव...

अजित पवार आले नसते तर आमचे १०० आमदार जिंकून आले असते.- गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य.🎾भारताने पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडवर मिळवला दमदार विजय

🟥अजित पवार आले नसते तर आमचे १०० आमदार जिंकून आले असते.- गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य.
🎾भारताने पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडवर मिळवला दमदार विजय

नांदेड :- प्रतिनिधी.

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज नांदेड येथील कार्यक्रमात महायुतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आले नसते तर आमचेही 100 आमदार निवडून आले असते”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. अजित पवारांची एन्ट्री मागून झाली. कारण वरची अँडजस्टमेंट होती. असंही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं. एकनाथ शिंदे यांची सध्या आभार यात्रा सुरु आहे. ही आभार यात्रा आज नांदेडला पोहोचली. आभार यात्रेच्या आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या भाषणाआधी गुलाबराव पाटील यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी संबंधित वक्तव्य केलं.

🔴उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड येथील आभार यात्रेत गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुंवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या आधी झालेल्या भाषणात गुलाबराव पाटील यांनी आपल्या स्टाईलमध्ये विरोधकांचा समाचार घेतला. एकनाथ शिंदे यांच्यामुळे नांदेडचा इतिहास बदलला आहे. या जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याचे काम हेमंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना, भगवा आणि शिवसेना प्रमुखांचे विचार वाचवण्याचे काम केले. त्यासाठीच आम्ही सुरत मार्गे गुवहाटीला गेलो. पण आमच्या या निर्णयावर गद्दार म्हणून टीका केली जाते. पण विधानसभा निवडणुकीत आमच्या लाडक्या बहि‍णींनी रेकाॅर्डब्रेक यश दिले आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा २३७ आमदार महायुतीचे निवडून आले. असे गुलाबराव पाटील म्हणाले.

🟥राज्यातील गोरगरीबांसाठी योजना राबवत एकनाथ शिंदे यांचा हात कोणीही धरू शकत नाही. ते खऱ्या अर्थाने जादूगर आहेत. त्यांच्या जादूमुळेच लोकसभेला सात खासदार आणि विधानसभेत ८० जागा लढवून आमचे ६० आमदार निवडून आले. अजितदादा नसते तर आमचेही शंभर आमदार निवडून आले असते, पण त्यांची मागून एन्ट्री झाली. दिल्लीहून काही निर्णय झाले, ते स्वीकारावे लागतात, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. अजित पवार नसते तर आमचेही १०० आमदार झाले असते. त्यांची मागून एन्ट्री झाली म्हणून प्रोब्लेम झाला. शेवटी वरची अँडजस्टमेंट आहे. आमच्या साहेबांनी दाडीवर हात फिरवला तर काम होऊन जाईल. आम्ही ८० जागा लढवल्या, आमचे ६० आमदार निवडून आले, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही प्रतिक्रिया देण्यात येते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चौकट.. मुळात विधानसभा निवडणुकीत शिंदे शिवसेना यांनी ८० जागा लढवल्या मग १०० जागा कशा निवडून आल्या असत्या.. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर तर्क वितर्क लढवले जात आहे.

🎾भारताने पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडवर मिळवला दमदार विजय

नागपूर :- प्रतिनिधी.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेला पहिला वन-डे सामना टीम इंडिया 4 विकेट्स आणि तब्बल 68 बॉल्स राखून जिंकला आहे. इंग्लंडनं दिलेलं 249 रन्सचं आव्हान भारतानं विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. शुबमन गिल आणि हर्षित राणा या तरुण खेळाडूंची दमदार कामगिरी त्याला श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या तरुण खेळाडूंनी दिलेली भक्कम साथ हे या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. टीम इंडियाच्या यंगिस्ताननं केलेल्या कामगिरीमुळे भारतानं तीन सामन्यांच्य़ा या वन-डे सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

🔴भारताकडून शुबमन गिलनं सर्वाधिक 87 रन्स केले. गिलला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या टीमचा व्हाईस कॅप्टन करण्यात आलं आहे. या निवडीवर प्रश्न विचारण्यात येत होते. गिलनं या सामन्यात दमदार खेळी करत टिकाकारांना बॅटनं उत्तर दिलं. यशस्वी जयस्वालच्या समावेशामुळे गिल या मॅचमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला होता. यशस्वी आणि रोहित झटपट आऊट झाल्यानं टीम इंडियाची स्थिती अडचणीत आली होती. त्यावेळी गिल आणि श्रेयस अय्यर जोडीनं भारतीय इनिंग सावरली.

🟥या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 94 रनची पार्टनरशिप केली. श्रेयसनं 36 बॉलमध्ये 59 रन केले. श्रेयस आऊट झाल्यानंतर गिल आणि अक्षर पटेलनं चौथ्या विकेटसाठी 108 रनची पार्टनरशिप करत टीम इंडियाचा विजय जवळ आणला. पाचव्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अक्षरनं 47 बॉलमध्ये 52 रन केले. त्यापूर्वी पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडची संपूर्ण इनिंग 47.4 ओव्हर्समध्ये 248 रन्सवर ऑल आऊट झाली. भारताकडून हर्षित राणा आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन्ही प्रकारातील पदार्पणाच्या मॅचमध्ये 3 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा हर्षित हा पहिला भारतीय बॉलर बनला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.