Homeकोंकण - ठाणेवन्य प्राण्यांमुळे तीन तालुक्यातील नागरिकांची जीवित व वित्त हानी तात्काळ बंदोबस्त करावा.-...

वन्य प्राण्यांमुळे तीन तालुक्यातील नागरिकांची जीवित व वित्त हानी तात्काळ बंदोबस्त करावा.- बहुजन पार्टी.🛑श्री गुंडू दादु हरेर यांच्या अमृत महोत्सवी निमित्ताने शिबीराची – ऑपरेशनची पुर्तता…

🛑वन्य प्राण्यांमुळे तीन तालुक्यातील नागरिकांची जीवित व वित्त हानी तात्काळ बंदोबस्त करावा.- बहुजन पार्टी.
🛑श्री गुंडू दादु हरेर यांच्या अमृत महोत्सवी निमित्ताने शिबीराची – ऑपरेशनची पुर्तता…

गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

आजरा तालुका हा पश्चिम घाटामधील जंगल भागातील निसर्गाने परिपूर्ण असलेला तालुका आहे. सदर तालुक्यामधील शेतकरी हा आपल्या अर्थकारणातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपल्या भागामध्ये शैक्षणिक संस्था कमी असल्यामुळे अधिकाधिक शेतकरी हे शेतीवर अवलंबून आहेत. येथे ऊस, तांदूळ, नाचणी, भुईमूग मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते.
सदर तालुका हा डोंगराळ व जंगल भागात असल्यामुळे येथे गवे रेडे, टस्कर हत्ती, तसेच रानडुक्कर, बिबट्या व अलीकडेच आढळलेले पट्टेरी वाघ या प्राण्यांचे वास्तव्य येथे आहे. आपला पश्चिम घाट हा युनेस्कोच्या ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’चा एक भाग असून आपल्या भागाला जगातील ‘हॉटेस्ट हॉटस्पॉट’चा दर्जा सुद्धा मिळालेला आहे.

त्यामुळे येथील जंगलांचे, निसर्गांचे संरक्षण करणे ही शासन प्रशासनाची जबाबदारी आहे. भारतीय संविधानाच्या कलम 48(a) व 51(a) नुसार भारतातील वन्य प्राण्यांचे, वनस्पतींचे, निसर्गाचे रक्षण करणे ही राज्याच्या जबाबदारीपैकी एक महत्त्वाची जबाबदारी सांगितलेली आहे. वन्यप्राणी व जंगलांचे, त्यातील संपत्तीचे संरक्षण करणे हे संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेले आहे.


असे असले तरीही निसर्गाचा एक भाग असलेला मनुष्य देखील एक प्राणी असून त्यालाही जगण्याचा अधिकार हा भारतीय संविधानात कलम २१ नुसार मूलभूत अधिकारांमध्ये नमूद केलेला आहे. त्यामुळे या भागातील राहणाऱ्या नागरिकांचे संरक्षण करणे हेही सरकारचे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांनी जंगलाच्या हद्दी जवळ असणाऱ्या शेती कसण्याचे पूर्णपणे बंद केलेले आहे. जे शेतकरी अशा भागात शेती करतात त्यांना त्यांच्या शेतामध्येच रात्रंदिवस पहारा द्यावा लागतो. निश्चितच हे अतिशय त्रासदायक आहे.
याशिवाय महत्त्वाचे असे की या प्राण्यांच्यासाठी आपल्या भागात जंगल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असूनही सदर प्राणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन शेतीचे नुकसान करत असतात. याशिवाय ते कधी कधी शेतकऱ्यांवर, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांवर हल्ला करून त्यांना जखमी करत असतात. अनेकदा अशा हल्ल्यांमध्ये काही नागरिकांचा मृत्यूही झालेला आहे. एखाद्या शेतकऱ्याने जंगलामध्ये जाऊन एखादे झाड तोडले अथवा एखाद्या प्राण्याची हत्या केली तर त्या शेतकऱ्याला शिक्षा केली जाते. मग एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात येऊन एखाद्या वन्य प्राण्याने हल्ला करून शेतकऱ्याचा जीव घेतला तर त्याला जबाबदार कुणाला मानावे? मग यासाठी संबंधित विभागाचे शासकीय कर्मचारी तसेच जनतेच्या मतांवर निवडून गेलेले लोकप्रतिनिधी जबाबदार नाहीत का? याशिवाय शेतकऱ्यांना शेतमालाचे नुकसान केल्यानंतर जी नुकसान भरपाई दिली जाते ती अगदीच किरकोळ असते. तेवढ्या किमतीत शेतकऱ्यांच्या शेतात नांगरणी सुद्धा होऊ शकत नाही. शेतकऱ्याची झालेली ही नुकसान भरपाई योग्य पद्धतीने कशी होईल तर यासाठी IRMA (income risk management act) नावाचा कायदा जो भारताबाहेर इतर देशांमध्ये लागू आहे तसाच कायदा भारतात सुद्धा लागू करावा आणि त्यानुसार शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान झाल्यास त्याला नुकसान भरपाई मिळावी. असे झाल्यास शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा होणारा त्रास झाला तरी तो कमी प्रमाणात होईल. तरी यावर आपण लवकरात लवकर काही उपाययोजना कराव्यात अन्यथा संपूर्ण आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात उद्रेक होऊन त्याचा त्रास शासनाला प्रशासनाला होणार आहे. सदर निवेदन हे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आपणास विनंती करण्यासाठी दिलेले आहे की लवकरात लवकर आपण या वन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त करून शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा. अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सरकार विरोधात तीव्र आंदोलने छेडण्यात येतील व या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस सरकार जबाबदार असेल याची नोंद घ्यावी..असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

🛑श्री गुंडू दादु हरेर यांच्या अमृत महोत्सवी निमित्ताने शिबीराची – ऑपरेशनची पुर्तता…

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील श्री गुंडू दादु हरेर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त
निरामय क्लिनिक आजरा येथे
नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते. सदर शिबीराची ऑपरेशन ची पुर्तता करण्यात आली.‌

त्यातील मोतिबिंदू ऑपरेशन ला निवड करण्यात आलेल्या लाभार्थी यांचे, नॅब नेत्र रुग्णालय मिरज येथे मोबत ऑपरेशन करण्यात आले.

या कार्यक्रमास डॉ विल्फ्रेड डिसोझा, डाॅ. आर पी डिसोझा, डाॅ. अनिता डिसोझा, डाॅ. सुदाम हारेर, काॅ. शांताराम पाटील, काॅ संजय घाटगे, महादेव होडगे, मनप्पा बोलके, प्रेमा शिवणगेकर, हिंदूराव कांबळे,गणपती ढोणूक्ष रझाक भडगावकर, शोभा पाटील, शिवाजी भगुत्रे, नरसू शिंदे, आनंदा सुतार याच्या सह गिरणीकामगार, जेष्ठ नागरिक, वारकरी मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.