आंबेओहोळ धरणग्रस्तांची १२ फेब्रुवारीला बैठक.
दि ४ फेब्रुवारीचे आंदोलन स्थगित.- कॉम्रेड. शिवाजी गुरव./ वाढत्या चोऱ्या रोखून चोरट्यांवर कडक कार्यवाई बाबत. आजरा उभाठा शिवसेनेचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
आंबेओहोळ धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लावण्यासाठी बैठक बोलवा अन्यथा ४ फेब्रुवारी २०२५ पासून धरणे आंदोलन करण्याचा इशारा संग्राम संघटनेने दिला होता. दरम्यान महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव गडहिंग्लज दौऱ्यावर आले होते, त्यावेळी प्रांताधिकारी व डॉ. बाबा आढाव यांची चर्चा झाली तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी देखील निवेदनाच्या अनुषंगाने बैठक घेण्याच्या प्रांताधिकार्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांना लेखी पत्र देऊन दि. १२ रोजी बैठक घेण्याची लेखी पत्र दिले व आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केली आहे. त्यानंतर आंदोलन स्थगित करून बैठकीची तयारी करत असल्याचे संग्राम संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान प्रकल्पग्रस्तांनी आपले पुनर्वसन कोणत्या प्रकारचे राहिले आहे त्याचे लेखी अर्ज तयार करून आणावेत तसेच दि. १२ रोजी रोजी ठीक स. ११ वा. प्रांताधिकारी गडहिंग्लज कार्यालयामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन श्री गुरव यांनी केले आहे.

वाढत्या चोऱ्या रोखून चोरट्यांवर कडक कार्यवाई बाबत. आजरा उभाठा शिवसेनेचे निवेदन.
आजरा – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यात होत असलेल्या वाढत्या घरफोडी याबाबत शिवसेना उभाठा आजरा तालुक्याच्या वतीने आजरा पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलेले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा तालुक्यात वाढती चोरी रोखून चोरट्यांवर कडक कार्यवाई करावी तसेच गेल्या काही दिवसांपासून आजरा शहर व तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरट्यांकडून बंद घरे लक्ष्य केली जात आहे, तालुक्यातील सर्वसामान्य व गरीब जनतेने कष्टाने मिळविलेले दागिने, पैसे तसेच संसारपयोगी साहित्य् लंपास केले जात आहे. या चोरींचा तात्काळ छडा लावून चोरट्यांचा शोध घ्यावा व चोरट्यांवर कठोर कार्यवाई करावी. चोऱ्यांचा छडा लावून चोराच्च्यांवर कार्यवाही न झाल्यास आगामी काळात शिवसेनेकडून आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर ओकार माद्याळकर शिववसेना शहर प्रमुख, उपजिल्हा अधिकारी, समिर चाॉद. उपशहर प्रमुख शिवसेना अनपाल तकिलदार उपशहर प्रमुख, रविन्द्र सावत
हणमंत पाटील, दिलीप चव्हाण
सह शिवसेना युवासेना पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.