Homeकोंकण - ठाणेजिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दोन वरिष्ठ अधिकारी लाच स्वीकारताना सापडले रंगेहात.- ३३ हजारांची...

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दोन वरिष्ठ अधिकारी लाच स्वीकारताना सापडले रंगेहात.- ३३ हजारांची लाच घेताना पकडले.

🟥जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दोन वरिष्ठ अधिकारी लाच स्वीकारताना सापडले रंगेहात.- ३३ हजारांची लाच घेताना ताब्यात

ओराेस :- प्रतिनिधी.

लाच लुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक अरुण पवार यांनी लावलेल्या सापळ्यात सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दोन वरिष्ठ अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात सापडले. सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक वर्ग १ माणिक भानुदास सांगळे वय ५६ व कार्यालय अधीक्षक वर्ग ३ उर्मिला महादेव यादव या दोघांना ३३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले. त्यामुळे सहकारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

🔴गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणी कामी यातील तक्रारदार यांचे श्री. स्वामी समर्थ गृहनिर्माण संस्था मर्यादीत, रेवतळे, मालवण, जि. सिंधुदुर्ग या गृहनिर्माण संस्थेच्या मानीव अभिहस्तांतरण आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करुन जमीन संस्थेच्या नावे करणेकरिता 50 हजार रुपये रकमेच्या लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रार 10 जानेवारी 2025 रोजी प्राप्त झाली होती. 16 जानेवारी 2025 रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेविका उर्मिला यादव यांनी तक्रारदार यांच्याकडे रुपये 40 हजार रुपये लाचेची रक्कम मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.