Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रव्यंकटराव येथे माजी विद्यार्थी व दाते सुनील गोवेकर यांचा सत्कार संपन्न.

व्यंकटराव येथे माजी विद्यार्थी व दाते सुनील गोवेकर यांचा सत्कार संपन्न.

व्यंकटराव येथे माजी विद्यार्थी व दाते सुनील गोवेकर यांचा सत्कार संपन्न.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील व्यंकटरा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा प्रशालेतील संचालक सचिन शिंपी यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या उदाक्त कल्पनेतून आपले मित्र सुनील गोवेकर हे सध्या पुणे येथे उद्योजक आहेत यांना त्या संदर्भात कल्पना दिली. याप्रमाणे त्यांनी प्रशालालेला वॉटर प्युरिफायर ,(आरो सिस्टीम रु.१ लाख ६५ हजार किमतीचे) भेट दिली…

त्यानिमित्ताने संस्थेच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष एस पी कांबळे, सचिव अभिषेक शिंपी, संचालक पांडुरंग जाधव, सचिन शिंपी, कृष्णा पटेकर, विलास पाटील, सुधीर जाधव, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार, सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष श्री शिंपी यांनी आपल्या मनोगत सांगितले की, श्री‌. गोवेकर यांनी दिलेल्या या प्युरिफायर सिस्टम मधून येणाऱ्या शुद्ध पाण्याच्या प्रत्येक थेंबातून त्यांच्या या दातृत्वाची आठवण ठेवेल ..
संस्थेचे सचिव श्री. शिंपी यांनी ही या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.अशाच माजी विद्यार्थ्यांचा शाळेकडे मदतीचा ओघ वाढत जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.येथून पुढे शाळा सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे व त्यांच्या विचारांचे नेहमी स्वागत करेल‌. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी आर पाटील व आभार पी.व्ही पाटील यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.