श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा – आयोजित कै. उर्मिला मायदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महिलांची सुगम गायन स्पर्धा संपन्न.
आजरा – प्रतिनिधी.
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा आयोजित कै उर्मिला श्रीपाद मायदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महिलांची सुगम गायन स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेची सुरवात कै. उर्मिला मायदेव यांच्या प्रतीमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सौ. विनया मायदेव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्षा सौ. विद्या हरेर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
महिलांच्या सुगम गायन स्पर्धेत कु. सुकन्या संजय शेणवी (विटे) यांनी प्रथम क्रमांक मिळविला, सौ. निता चेतन हरेर (कासार कांडगाव) यांनी व्दितीय तर सौ. कृष्णा देवेंद्र पाचवडेकर (आजरा) यांनी तृतीय क्रमांक मिळवीला विजेत्यांना सौ. विनया मायदेव, वामन सामंत व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले सुगम गायन स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून सौ. रूपा कडवाले व सौ. श्रध्दा वाटवे यांनी तर संगीत संयोजन डॉ. कृष्णा होरांबळे, सुरेंद्र हिरेमठ व दत्ता सावंत यांनी केले.
यावेळी वाचनालयाचे कार्यवाह कुंडलिक नावलकर, सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, डॉ. अंजनी देशपांडे, ज्योत्स्ना चराटी, अस्मिता जाधव, अनिता नाईक, डॉ गौरी भोसले, पूनम आजगेकर, विणा जोशी, सुरेखा भालेराव, शर्मिला सातोसकर, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, प्रा. संदीप देसाई, निखिल कळेकर, बी. एम. कामत, यांसह संगीतप्रेमी नागरिक उपस्थित होते. यानिमित्ताने आयोजित महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमासही महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. संचालिका गिता पोतदार यांनी सुत्रसंचालन केले तर सौ सुचेता गडडी यांनी आभार मानले.