Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रपरम पूज्य लक्ष्मण रामा परब उर्फ श्री चंद्रानन स्वामी महाराज यांचे पुण्यस्मरण...

परम पूज्य लक्ष्मण रामा परब उर्फ श्री चंद्रानन स्वामी महाराज यांचे पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न.🛑श्री. गंडु दादू हरेर यांच्या ७५ व्या ( अमृत मोहोत्सवी सोहळा निमित्ताने आजऱ्यात मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न.🛑”विद्या मंदिर होनेवाडी समुहनृत्य स्पर्धेत कनिष्ठ विभागातून जिल्ह्यात तृतीय”

🛑परम पूज्य लक्ष्मण रामा परब उर्फ श्री चंद्रानन स्वामी महाराज यांचे पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न.
🛑श्री. गंडु दादू हरेर यांच्या ७५ व्या ( अमृत मोहोत्सवी सोहळा निमित्ताने आजऱ्यात मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न.
🛑”विद्या मंदिर होनेवाडी समुहनृत्य स्पर्धेत कनिष्ठ विभागातून जिल्ह्यात तृतीय”

आजरा.- प्रतिनिधी.

परम पूज्य लक्ष्मण रामा परब उर्फ श्री चंद्रानन स्वामी महाराज यांचे पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न झाला.
श्री क्षेत्र दत्त मंदिर शेळप ता. आजरा या ठिकाणी शुक्रवार दि. ३१ रोजी परमपूज्य श्री चंद्रनन स्वामी महाराज यांच्या पुण्यस्मरणा निमित्त शामराव कृष्णा पाटील व. सौ शुभांगी शामराव पाटील यांचे हस्ते श्रीस अभिषेक करण्यात आला. पुरोहित म्हणून श्री मारुती परब यांनी काम पाहिले . श्री पद्मनाभाच्याच्यार्य शिष्य सांप्रदाय मंडळ शेळप यांचे कडून हरिपाठ सादर केला गेला. त्यानंतर शेळप, खेडगे, मेढेवाडी, पारपोली व पंचक्रोशीतील महिलांचे भजन सादर करण्यात आले. यावेळी जेष्ठ गुरुबंधूचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रस्ताविक पर मनोगतात चंद्रकांत घुणे यांनी श्रीमत सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज यांच्या पवित्र कार्यार्थ व परमपूज्य चंद्रानन स्वामी यांनी इतरांचे सहकार्याने शेळप गावी श्री दत्त मंदिर या ठिकाणी सन १९६४ सालापासून सत्य श्रेष्ठ ईश्वरी ज्ञानाचे व भक्तिमार्गाचे कार्य सुरू केले आहे. आपले जीवन अध्यात्मिक क्षेत्रात वाहून घेतले. भजन कीर्तन प्रवचन उपदेश यातून सांप्रदायाला संजीवनी मिळाली परमपूज्य चंद्रानन स्वामिनी आपल्या मधुर वाणीच्या जोरावर अभ्यासू वृत्तीने ज्ञानाची अनेक कवाडे शिष्यापुढे खुली केली चंद्रानन स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत कोल्हापूर, सांगली, गोवा, मुंबई, ठाणे, पालघर व पंचक्रोशी येथून बरेच गुरुबंधू भेट देतात. परमपूज्य चंद्रानन स्वामींच्या जीवनकार्याचा आढावा अनेक मान्यवरानी घेतला. सदर कार्यक्रमासाठी सौ. विजयालक्ष्मी आबिटकर या उपस्थित होत्या. तसेच सौ.पांगीरेकर वहिनी – प्राचार्य मौनी विद्यापीठ गारगोटी, अनिकेत चराटी- संचालक आजरा सूतगिरणी, जितेंद्र भोसले, युवराज पाटील- सरपंच ग्रामपंचायत दाभिल, प्रकाश कविटकर- उपसरपंच पारपोली, अर्जुन बागडी – सरपंच ग्रामपंचायत शेळप, रवींद्र जाधव, बाबुराव खांबे, सुभाष देसाई संचालक आजरा साखर कारखाना हे मान्यवर व खेडगे, पारपोली दाभिल, मेढेवाडी व पंचक्रोशीतील भक्तगण व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यानंतर सर्व उपस्थित भक्तगणांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

🛑श्री. गंडु दादू हरेर यांच्या ७५ व्या ( अमृत मोहोत्सवी सोहळा निमित्ताने आजऱ्यात मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न.
( पेशंट १७२, चष्मे ९० मोफत
मोतिबिंदू ऑपरेशन निवड ४९ )

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथे श्री. गंंडु दादू हरेर यांच्या ७५ व्या अमृत मोहोत्सवी सोहळा निमित्य नॅब नेत्र रुग्णालय मिरज व जेष्ठ नागरी संघटना व सर्व श्रमिक संघटना शाखा आजरा यांच्या संयुक्त विद्यमानेने नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले.‌ यामध्ये पेशंट १७२, चष्मे ९० मोफत
मोतिबिंदू ऑपरेशन निवड ४९ पेशंट रेफरल करण्यात आले.‌
( उपलब्ध नेत्र सेवा.) मोफत नेत्र तपासणी, चष्मा नंबर तपासणी, मोफत (लेन्स सह) मोतीबिंदू ऑपरेशन. तपासणीची वेळ- शुक्रवार दि. ३१/०१/२०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ठिकाण निरामय क्लिनीक सुभाष गल्ली, आजरा ता. आजरा येथे शुक्रवारी दि. ३१/१/२०२५ शिबीर, मंगळवारी दि ४/२/३०२५ रोजी मिरज येथे पेशंट पाठवण्यात आले, लेन्स सह पुर्ण मोफत ऑपरेशन नियोजन केले होते. यावेळी
कॉ. शांताराम पाटील (सर्व श्रमिक संघटना अध्यक्ष) डॉ आर पि डिसोझा, डॉ अनिता डिसोझा, महादेव होडगे (जेष्ठ नागरीक सं. अध्यक्ष) कॉ, संजय घाटगे मो. सुदाम हारेर, सुरज लॅब, यशोदा फांऊडेशन यांचे सहकार्य लाभले.

🛑”विद्या मंदिर होनेवाडी समुहनृत्य स्पर्धेत कनिष्ठ विभागातून जिल्ह्यात तृतीय”

आजरा .- प्रतिनिधी

जिल्हा परिषद कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय विद्यार्थी सांस्कृतिक स्पर्धा २०२४-२०२५ समूह नृत्य स्पर्धेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे स्पर्धक सहभागी झाले होते.कनिष्ठ विभाग समुह नृत्यात विद्यामंदिर होनेवाडी ता.आजरा या शाळेने पंढरीची वारी या गीतावर नृत्य सादर केले सर्वात महत्वाचे म्हणजे सदर गीत प्रतिक तुरंबेकर या इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्याने स्वतः गायले. या उत्कृष्ट सादरीकरणाला “तृतीय क्रमांक” मिळाला.आकर्षक शिल्ड व सहभागी विद्यार्थांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.आजरा तालुक्यासह विद्या मंदिर होनेवाडी चा नावलौकिक जिल्ह्यात वाढविल्याबद्दल सर्वच स्तरातून या बालचमुंचे सर्वत्र कौतुक होत आहे.समुह नृत्य स्पर्धेत सहभागी विद्यार्थी यांना मुख्याध्यापक अशोक मुळीक, शिक्षिका राजश्री पाटील, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष राधिका पाटील यांचेसह सर्व सदस्य व ग्रा.पं.होनेवाडी ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.