Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमहालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त भादवणकरांचा सामुहिक विमान प्रवास.‌ ( राज्याचे माजी गृहराज्यमंत्री मंत्री...

महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त भादवणकरांचा सामुहिक विमान प्रवास.‌ ( राज्याचे माजी गृहराज्यमंत्री मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी सर्व भादवणकरांचे कोल्हापूरविमानतळावर केले स्वागत. )

महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त भादवणकरांचा सामुहिक विमान प्रवास.‌ ( राज्याचे माजी गृहराज्यमंत्री मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी सर्व भादवणकरांचे कोल्हापूर
विमानतळावर केले स्वागत. )

आजरा.- प्रतिनिधी.

भादवण ता. आजरा येथील सालाबादप्रमाणे होणाऱ्या महालक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी मुंबई ग्रामस्थ यांनी विमान प्रवास करत यात्रेला येण्याचा निर्णय घेतला.
महालक्ष्मी देवीच्या यात्रेला गावी जात असताना पुढील वर्षी आपण विमानाने यात्रेला जावू असं अधिच ठरले होते. व येणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी नियोजन केले
जिद्द आणि चिकाटी असली की आपण काहीही साध्य करू शकतो याचं साजेश उदाहरण म्हणजे आपल्या महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त भादवणवाशियांचा होत असलेला आयुष्यातील एक संस्मरणिय विमान प्रवास मध्ये प्रामुख्याने सामुहिक हवाई प्रवास घडवून आणणारे, समाजसेवेचा वसा घेतलेले आणि विशेष म्हणजे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर कार्यरत असलेले आपल्या सर्वांच्या परिचयाचे आपल्या गावाचे सुपुत्र आर. बी. पाटील भादवणकरांच्या वतीने त्यांचे येणाऱ्या प्रवाशांनी मन:पूर्वक आभार मानले.

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एक तरी गोष्ट नक्की असते ती नेहमी आठवणीत राहते, असाच हा आजचा विमान प्रवास. हा प्रवास करणाऱ्यांमध्ये बहुतेक जण हे पहिल्यांदाच विमान प्रवास करत आहेत. त्यामुळे आजचा पहिला विमान प्रवास हा त्यांच्यासाठी सोनेरी क्षणच म्हणावा लागेल!! या पहिल्या विमान प्रवाशाच्या आठवणी नेहमीच स्मरणात राहतील. ११ डिसेंबरला विमान प्रवासाचे तिकीट बुक तर झाले. प्रवासाचा दिवस जसा हळू हळू जवळ येवू लागला तशी हवाई प्रवासाची उत्सुकता आणखी वाढू लागते तयारी झाली आता फक्त आयुष्यातील एका वेगळ्या प्रवासाला अनुभवाला समोर जायचं प्रवासाचा दिवस उजाडला, प्रवासाची वेळ जवळ येवू लागली. सहार एअरपोर्ट वर सगळे जण जमा होवू लागले.

आजचा सामुहीक विमान प्रवासाचे नीटनेटके आयोजन करणारे आर बी पाटील यांनी सर्व प्रवाशांसाठी विशेष सूचना दिल्या.शिवाय टी शर्ट देऊन सर्वांना एक आश्चर्याचा धक्काच दिला. सर्वांना व्यवस्थित सूचना करून टी शर्ट घालायला दिले. आता थोड्याच वेळात मुंबई ते कोल्हापूर महालक्ष्मी देवीची यात्रा स्पेशल विमान टेकऑफ करणार….
विमान प्रवास करणाऱ्या सर्वांना स्नेहमय शुभेच्छा ! ग्रामस्थांनी दिल्या.‌ कोल्हापूर विमानतळावर महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी सर्व भादवणकरांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत केले. तिथून पुढचा प्रवास कोल्हापूर विमानतळ ते भादवण विशेष बसनी चालू झाला त्यासाठी भादवण गावचे प्रतिनिधी ज्ञानदेव पाटील, दत्तात्रय शिवगंड आणि पी. के. केसरकर यांनी कोल्हापूर विमान तळावर उपस्थित राहून पुषगुच्छ देवून सर्वांचे स्वागत केले. सर्वजण बसमध्ये आसनस्थ झाले पुन्हा एकदा महालक्ष्मी देवीच्या नावाने घोषणा देवून पुढचा प्रवास सुरु झाला. भादवण गावात आगमन होताच उपसरपंच संजय पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून सर्वांचे स्वागत केले, नंतर शाळेच्या मुलांकडून वाजत गाजत लेझिम खेळून सहर्ष स्वागत करण्यात आले.
गावात एकच चर्चा चालू झाली, यावर्षी भादवणकारनी गावच्या महालक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी विमान बुक केले. सर्वजण हसतमुख आणि प्रसन्न चेहऱ्याने आप आपल्या घरी पोहचले.पहिल्या सामुहिक विमान प्रवासाची आठवण कायम स्मरणात ठेवत…
भादवण हे महाराष्टातील पाहिले गाव असेल त्यांनी गावच्या महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विमान बुक केलं. या विमान प्रवासाची कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा होत आहे.‌

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.